आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कार्यशाळा:‘आयसा’च्या चौथ्या एक्स्पाेनंतर शहरातील सप्लायर असाेसिएशनच्या उलाढालीत 100 कोटींची वाढ शक्य

औरंगाबाद / रोशनी शिंपी3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

रेल्वेस्टेशन रोडवरील अयोध्यानगरी मैदानावर १६ ते १९ डिसेंबरदरम्यान ‘आयसा इंजिनिअरिंग एक्स्पो’चे आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनानंतर उद्याेजकांच्या उलाढालीत १०० ते १२० कोटींची वाढ होईल, असा अंदाज औरंगाबाद इंडस्ट्रियल असोसिएशनचे (आयसा) अध्यक्ष सूरज ढुमणे यांनी व्यक्त केला. एक्स्पोच्या पार्श्वभूमीवर दिव्य मराठीने त्यांच्याशी संवाद साधला. ढुमणे म्हणाले, पुरवठा करणाऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी आयसाची स्थापना हरिलाल नाथानी यांच्या संकल्पनेतून १९९१ मध्ये झाली. सध्या संघटनेचे २६० सदस्य आहेत. औरंगाबादेत १० वर्षांतील हे चौथे प्रदर्शन असूून यासाठी ८० लाखांचा खर्च आला आहे. पहिल्या प्रदर्शनाला १६ हजार तर आता २० हजार जण भेट देतील. इलेक्ट्रिकल, हायड्रॉलिक आणि न्यूमॅटिक्स, वेल्डिंग मटेरियल, टेस्ट व मेजरमेंट टूल्स तसेच मटेरियल हँडलिंग टूल्स या उत्पादनांना जास्त मागणी आहे. वर्षभरात आठ कार्यक्रम : आयसा वर्षभरात ८ कार्यक्रमांचे आयोजन करते. यामध्ये सायबर सुरक्षा, आध्यात्मिक संवाद याचा प्रामुख्याने समावेश असतो, असेही ढुमणे यांनी सांगितले.

पाच वर्षात आॅनलाइन पर्याय उपलब्ध मागील पाच वर्षांत अनेक ऑनलाइन पर्याय उपलब्ध झाले आहेत. मात्र, अडचण आल्यावर तत्काळ समस्या सोडवण्यासाठी आम्ही आहोत. त्यामुळे शहरातील उद्योगांना सप्लायर्सची माहिती व्हावी, हा आयोजनाचा प्रमुख उद्देश आहे.

आयसा, वैसा आणि कैसा... आयसा संघटनेच्या आणखी दोन विंग आहेत. त्या वर्षभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करत असतात. त्यापैकी एक “वैसा” म्हणजे वाइफ ऑफ आयसा मेंबर्स या संघटनेत आयसा प्रतिनिधींच्या पत्नींसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. तर “कैसा” अर्थात किड्स ऑफ आयसा मेंबर म्हणजे मुलांसाठी विविध कार्यक्रम घेतले जातात.

अपघात टाळण्यासाठी तीन कार्यशाळा घेणार या एक्स्पोत पहिल्यांदाच सेफ्टी अप्लायन्स मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशनने सहभाग घेतला आहे. इंडस्ट्रीत हाेणारे अपघात टाळता यावेत म्हणून तीन कार्यशाळा घेतल्या जातील. त्यात सुरक्षेचे विविध उपाय, साधने यावर मार्गदर्शन होईल.

बातम्या आणखी आहेत...