आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबाद:सायकलिस्ट क्लब तर्फे फ्रेंडशिप डे निम्मिताने 100 सायकलची फेरी

औरंगाबादएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

फ्रेंडशिप डे निमित्त औरंगाबादच्या सायकलिंग क्लब तर्फे 100 सायकल ची फेरी काढण्यात आली. पहाटे 5.30 वाजता या सायकल फेरीला मराठवाड्यातून सर्व प्रथम सायकल वर नर्मदा परिक्रमा पूर्ण करणारे अनंत ढवळे व डॉ विजय व्यवहारे यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवण्यात आली. या वेळी औरंगाबाद शहराचे फिटनेस आयकॉन जयंत सांगवीकर यांची प्रमुख उपस्थिती होती.त्यांनी 50 KMS सायकल चालवून सर्वांना प्रोत्साहन दिले.

औरंगाबाद सायकलिंग क्लब चे मेंबर्स दर महिन्याला 100 kms सायकलिंग चे आयोजन करतात, या रविवारी मैत्र दिना निमित्ताने क्लब तर्फे 25, 50, व 100kms औरंगाबाद ते खंडातील मातीपासून बांधलेले सर्वात मोठे धरण नाथसागर इथ पर्यंत सायकलिंग करण्यात आली. जायकवाडी नाथसागर प्रकल्पाचे अभियंता दाभाडे यांनी सर्व सायकलिस्ट चे स्वागत केले. औ.सा.क्लब सामाजिक जाणिवेचे भान राखून, आपले समाजासाठी देणे लागते या भावनेतून विविध विषयावर सायकल फेरीचे आयोजन करतात. या वेळी प्रत्येक सायकलिस्ट ने 1 झाड लावून ते जागवावे आणि पार्यावरण वाचावा असा संकल्प केला.

झाडें लावा झाडें जगवा असा संदेश या वेळी दिला

कोरोना महामारीच्या या दिवसा मध्ये सायकलिंग सारखा उत्तम व्यायाम असल्याने सगळेच सायकलिंग कडे वळले आहेत. त्यामुळे सर्वांनी सायकल चालवताना नियमाचे पालन करावे असे आवाहन अमोल कदम यांनी केले. सायकलिंग नियमांचे पालन व वेळेवर फेरी चालू करून ही उत्तम रित्या पूर्ण करण्यात आली. या फेरी मध्ये श्री अनंत ढवळे, डॉ विजय व्यवहारे, पराजी जाधव,रुपेश शिंदे, हसन देवनीकर, योगेश पाटिल, अमोल कदम, शिवाजी वाघ, श्रेयसी ढवळे, गौरव ढवळे, प्रतीक अरसुले व दत्ताभाऊ सारुक यांनी 100 kms सायकलिंग पूर्ण केली तर 50 kms मध्ये जयंत सांगवीकर,आडवोकेट मनोज बोईनवाड , संदीप भराड, अजित काकडेपाटिल , प्राजक्ता शिंदे, महेश मणके, नवनाथ चालक, विवेक कळसकर यांनी पूर्ण केली. या सर्वांचे विजय कटके, पंकज पाटिल, गणेश माहोरे यांनी अभिनंदन केले आहे .

बातम्या आणखी आहेत...