आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नांमका प्रकल्प:नांमकाचे 100 दलघफू पाणी पिण्यासाठी राखीव ठेवणार, पालकमंत्री संदिपान भुमरे यांची मान्यता

वैजापूर4 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

नांदूर-मधमेश्वर प्रकल्पात १०० दशलक्ष घनफूट पाणीसाठा पिण्यासाठी राखीव करण्याच्या प्रस्तावाला पाणी आरक्षण समितीचे अध्यक्ष पालकमंत्री संदिपान भुमरे यांनी मान्यता दिल्याची माहिती कार्यकारी अभियंता राकेश गुजरे यांनी दिली. यामुळे नांमका प्रकल्पाच्या चार धरणांत वैजापूर, गंगापूरसाठी कायमस्वरूपी पिण्याच्या पाण्याचा हक्क निश्चित झाला. कालवा लाभक्षेत्रातील ४५ ग्रामपंचायतींना बिगर सिंचन आरक्षण पाणीटंचाईच्या काळात लाभकारक ठरणार आहे.

२०१८ या वर्षातील पाणीसाठा वापराच्या नियोजनासाठी नांदूर-मधमेश्वर पाटबंधारे विभागाने जिल्हास्तरीय पाणी आरक्षण समितीकडे नाशिक जिल्ह्यातील मुकणे, भाम, भावली, वाकी चार धरणातील एकूण १०.७१ टीएमसी पाणी साठवण क्षमता आहे. त्यातून नांदूर-मधमेश्वर जलद कालवा लाभक्षेत्रातील वैजापूर, गंगापूर, कोपरगाव या तीन तालुक्यांना २००२ पासून सिंचनासाठी पाणी आवर्तन दिले जाते. प्रकल्पाच्या जलसाठ्यात वैजापूर, गंगापूरसाठी स्वतंत्र पिण्याचे पाणी आरक्षण नसल्यामुळे लाभक्षेत्रातील गावांना टंचाई काळात कालव्यातून बिगर सिंचनाचे पाणी घेण्यासाठी तांत्रिक अडचणीला सामोरे जावे लागत होते.

वैजापूर, गंगापूरला पिण्याचे पाणी देणार बिगर पाणी सिंचन नियोजनात पिण्यासाठी १५ टक्के, औद्योगिक १० टक्के आणि सिंचनासाठी ७५ टक्के अशा पद्धतीने वार्षिक पाणी वापर नियोजन करण्याच्या मार्गदर्शक सूचना आहेत. त्यानुसार वैजापूर-गंगापूरसाठी १०० दशलक्ष घनफूट पाणी पिण्यासाठी राखीव करण्यात आल्याची माहिती गुजरे यांनी दिली.

बातम्या आणखी आहेत...