आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

औरंगाबाद कोरोना:जिल्ह्यात बुधवारी 47 रुग्णांची वाढ तर एका रुग्णाचा मृत्यू , एकूण रुग्णसंख्या 1696, बळींचा आकडा 85

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • मराठवाड्यात कोरोनाचे 100 नवे रुग्ण, जालन्यात प्रथमच एका दिवसात 25 कोरोनाग्रस्त, बीड 2 रुग्ण
Advertisement
Advertisement

औरंगाबाद जिल्ह्यात आज सकाळी 47 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली आहे.त्यामुळे एकूण कोरोनाबाधितांची संख्या 1696 झाली असून 85 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे

आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे : जसवंतपुरा (1), संजय नगर, मुकुंदवाडी (1), खोकडपुरा (2), अजिंक्य नगर (1), समता नगर (2), समृद्धी नगर, एन-4 सिडको (1), जय भवानी नगर (1), लेबर कॉलनी (2), मिल कॉर्नर (4), हमालवाडी, रेल्वे स्टेशन (1), भावसिंपुरा (2), शिवशंकर कॉलनी (5), पिसादेवी रोड (1), कटकट गेट (1), सिल्लेखाना नूतन कॉलनी (1), बारी कॉलनी (1),उल्का नगरी (1),एन-सहा, संभाजी कॉलनी, सिडको (1),शरीफ कॉलनी (1),कैलास नगर (4), स्वप्न नगरी, गारखेडा परिसर (1), भवानी नगर, जुना मोंढा (1), पुंडलिक नगर रोड, गारखेडा (1), विद्यानिकेतन कॉलनी (1), सुराणा नगर (2), अन्य (3) आणि यशवंत नगर, पैठण (3), अब्दुलशहा नगर, सिल्लोड (1) या भागातील कोरानाबाधित आहेत. यामध्ये 21 महिला आणि 26 पुरुष रुग्णांचा समावेश आहे.

खासगी रुग्णालयात एका कोरोनाबाधिताचा मृत्यू 

औरंगाबाद शहरातील एका खासगी रुग्णालयामध्ये एन-चार ‍सिडको परिसरातील कोरोनाबाधित असलेल्या 74 वर्षीय पुरूष रुग्णाचा आज सकाळी 6.30 वाजता उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे आतापर्यंत घाटीत 68, तीन विविध खासगी रुग्णालयांमध्ये एकूण 16, मिनी घाटीमध्ये 01 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाल्याने जिल्ह्यात एकूण 85 कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचे प्रशासनाने सांगितले आहे.

मराठवाड्यात मंगळवारी १०० नव्या कोरोनाग्रस्तांची नोंद झाली. यापैकी औरंगाबादेत ६२ नवे रुग्ण वाढले असून ६ बळी गेले असून जालन्यात २५ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत तर दोन जणांचा मृत्यू झाला. उस्मानाबादेत ११ तर बीडमध्ये २ नव्या रुग्णांची भर पडली.

जालना जिल्ह्यात रुग्णसंख्या दीडशेवर

जालना जिल्ह्यात प्रथमच एका दिवसात २५ नवीन रुग्णांची भर पडली असून रुग्णसंख्या दीडशेवर गेली आहे. तर २४ तासांत दोन जणांचा कोरोनाने बळी गेला आहे. दोन दिवसांपूर्वी परतूर येथील एकाचा तर सोमवार शहरातील मोदीखाना भागातील ६० वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला.

बीड : ३ कोरोनामुक्त, २ नवे पॉझिटिव्ह

बीड जिल्ह्यात संध्याकाळी दोन नवे रुग्ण आढळले. यात शहरातील बालेपीर येथे एक ३२ वर्षीय महिला तर गेवराई तालुक्यातील सिरसदेवी ३६ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. त्यामुळे एकूण कोरोना बाधितांची संख्या २४ वर गेली आहे. तीन जण मंगळवारी सकाळी कोरोनामुक्त झाले.

उस्मानाबाद जिल्ह्यात नवे ११ रुग्ण आढळले

मंगळवारी उस्मानाबाद जिल्ह्यात एकाच दिवसात ११ नवे रुग्ण आढळले. यामध्ये शहरातील उस्मानपुरा भागातील ८ जणांचा समावेश आहे. शिराढोणमध्ये एक तर कळंबमधील दोघांना संसर्ग झाल्याचे निष्पन्न झाले. दरम्यान, जिल्ह्यातील कोरेानाबाधितांची संख्या आता ८८ वर गेली आहे.

राज्यात २२८७ नव्या रुग्णांची नोंद, १२२५ बरे

मुंबई | मंगळवारी कोरोनाच्या २२८७ नवीन रुग्णांचे निदान झाले असून १०३ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. तर १२२५ बरे झालेल्या रुग्णांना घरी सोडण्यात आले. राज्यातील एकूण रुग्णसंख्या ७२ हजार ३०० वर गेली आहे. त्यापैकी ३१ हजार ३३३ कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या ३८ हजार ४९३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ४ लाख ८३ हजार ८७५ नमुन्यांपैकी ७२ हजार ३०० जण कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत.

Advertisement
0