आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नोकरीची सुवर्ण संधी!:सेंट्रल बँकेत 100 जागा; 17 ऑक्टोबरपर्यंत करा ऑनलाईन अर्ज

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये विविध 110 जागांसाठी भरती केली जाणार आहे. पात्र उमेदवारांकडून 17 ऑक्टोबरपर्यंत ऑनलाईन अर्ज मागवले आहेत. त्याशिवाय महापारेषण कंपनीत प्रशिक्षणार्थींच्या 187 जागा आहेत. महाराष्ट्र लोकसेवा आयोगानेही सहाय्यक कक्ष अधिकाऱ्यांची 66 पदे निर्माण केले आहेत. त्यासाठी इच्छुक उमेदवार 20 ऑक्टोबरपर्यंत अर्ज करू शकतात.

सेंट्रल बँक ऑफ इंडियाने 110 जागांसाठी अर्ज मागवले आहेत. त्यामध्ये आयटी स्केलव्ही-01, अर्थतज्ज्ञ-1, डेटा सायंटिस्ट-1, आयटी-एसओसी विश्लेषक-1, आयटी सुरक्षा विश्लेषक -1, तांत्रिक अधिकारी (क्रेडिट)-15, क्रेडिट अधिकारी-6, डेटा इंजिनिअर-9, आयटी-11, जोखिम व्यवस्थापक-21, कायदा अधिकारी-5, आयटी (स्केल-2)-21, सुरक्षा (स्केल-2)-2, आर्थिक विश्लेषक-8, क्रेडिट अधिकारी (स्केल II)-2,सुरक्षा (स्केल I)-3 आदी पदे आहेत. पात्र ठरलेल्या उमेदवारांची 22 डिसेंबर रोजी मुलाखत घेतली जाणार आहे. अधिक माहितीसाठी www.centralbankofindia.co.in या संकेतस्थळाला भेट देता येऊ शकेल.

कोल्हापूर येथील महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ व महापारेषण कंपनी लिमिटेड येथे प्रशिक्षणार्थींच्या 178 जागांसाठी उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची अखेरची मुदत अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. 178 पैकी वीजतंत्री पदाच्या 51 जागा आहेत. दहावी झालेल्या उमेदवारांना तारतंत्री म्हणून सेवेत घेतले जाणार आहे. वीजतंत्रीच्या 127 जागा आहेत. त्यासाठी 8 उत्तीर्ण उमेदवारही चालतील. सविस्तर जाहीरात पाहण्यासाठी www.mahadiscom.in या संकेतस्थळास भेट द्यावी असे आवाहन महापारेषणतर्फे करण्यात आले आहे.

एमपीएससीतर्फे सहा.कक्ष अधिकाऱ्यांची 66 पदे

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत सहाय्यक कक्ष अधिकाऱ्यांची 66 पदे भरण्यात येणार आहे. 20 ऑक्टोबरपर्यंत ऑनलाईन अर्ज दाखल करण्याची मुदत आहे. सहायक कक्ष अधिकारी फक्त मंत्रालयीन प्रशासकीय विभागाच्या आस्थापनेवरील तसेच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कार्यालयातील कार्यरत लिपिक, लिपिक टंकलेखक व टंकलेखक संवर्गातील कर्मचारी देखील या पदांना अर्ज करू शकतात. www.mpsc.gov.in या संकेतस्थळाला भेट देऊन अधिक माहिती घ्यावी असे आवाहन करण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...