आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मेट्रो पार्किंगमध्ये आग:दिल्लीत 83 ई-रिक्षांसह 100 वाहने खाक, कुठलीही जीवितहानी नाही

औरंगाबाद24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्लीच्या जामियानगरमधील मेट्रो पार्किंगमध्ये बुधवारी पहाटे ५ वाजता आग लागली. ८३ ई-रिक्षा, ११ कार, ४ दुचाकी जळून खाक झाल्या. कुठलीही जीवितहानी झाली नाही. पार्किंगच्या एका भागात ईव्ही चार्जिंग पॉइंट लावलेले आहेत. ही आग शॉर्टसर्किट किंवा ईव्हीच्या बॅटरीत स्फोट झाल्याने लागली, असे सांगितले जात आहे. हा भाग पार्किंग, चार्जिंग स्टेशन म्हणून वापरला जातो. दिल्लीत मुंडकात १३ मे रोजी एका इमारतीत लागलेल्या आगीत २७ लोकांचा मृत्यू झाला होता.

जामिया नगरमध्ये राहणारा नूर नवाज खान (४६) याचे कोचिंग सेंटर मेट्रो स्टेशनपासून ५० मीटर अंतरावर आहे. पार्किंग क्षेत्रावर ई-रिक्षा चार्जिंग स्पॉटचाही समावेश असल्याची माहिती त्यांनी दिली. ते म्हणाले, 'पार्किंगचे दोन भाग करण्यात आले. एकाचा वापर ई-रिक्षा चार्ज करण्यासाठी तर दुसरा वाहने पार्क करण्यासाठी केला जात होता. मेट्रोच्या अधिकार्‍यांनी आराखडा मंजूर केला होता की त्यांना याची माहिती होती हे मला माहीत नाही, असे त्याने सांगितले. मात्र, याच कारणामुळे आग भडकल्याची माहिती आहे.

बातम्या आणखी आहेत...