आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करास्मार्ट सिटीमार्फत सिटी बस सेवा सुरू आहे. या सेवेत दररोज ७० सिटी बस धावत असून त्यांच्या रोज १ हजार फेऱ्या होत आहेत. २० हजार प्रवासी या सेवेचा लाभ घेत असून त्यातून स्मार्ट सिटीला दररोज ५ लाख रुपयांचे उत्पन्न मिळत आहे, अशी माहिती स्मार्ट सिटी बस संचालन प्रमुख डाॅ. राम पवनीकर यांनी दिली.
महापालिकेने सर्वसामान्य नागरिकांसाठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था म्हणून सिटी बससेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला. स्मार्ट सिटीमार्फत सिटी बस सेवा सुरू केली आहे. २०१८ मध्ये सुरू झालेल्या ८० बस रस्त्यावर उतरल्या होत्या. त्यासाठी एसटी महामंडळासोबत करार करण्यात आला. कोरोना संसर्ग सुरू होण्यापूर्वी जानेवारी २०२० मध्ये या बस दररोज १५ हजार किमीपर्यंत धावत होत्या. त्यानंतर कोरोना सुरू झाल्याने सिटी बस बंद करण्यात आली. कोरोनाचा प्रभाव कमी होत नाही तोच एसटी महामंडळाचा संप सुरू झाला. त्यामुळे स्मार्ट सिटीसाठी एसटी महामंडळाचे कर्मचारी न घेता माजी सैनिकांची भरती करून सिटी बस सुरू करण्यात आली. त्यानंतर कंत्राटी पद्धतीने चालक-वाहकांची नियुक्ती करण्यासाठी कंत्राटदार एजन्सीची नियुक्ती केली. त्यांच्यामार्फत ११० चालक व वाहकांची नियुक्ती करण्यात आली.
२८ मार्गांवर धावताहेत बस सुरुवातीला ११ सिटी बस सुरू करण्यात आल्या. त्यामध्ये टप्प्याटप्प्याने वाढ करून आता ७० बसेस २८ मार्गांवर धावत असून दररोज १ हजार फेऱ्या करत आहेत. या बस दररोज १९ हजार किमी धावत असून २० हजार प्रवासी त्याचा लाभ घेत आहेत. त्यातून स्मार्ट सिटीला दररोज ५ लाख रुपयांचे उत्पन्न मिळत आहे. चिकलठाणा, वाळूज एमआयडीसीकडे सुरू करण्यात आलेल्या सिटी बसद्वारे सर्वाधिक प्रवासी प्रवास करत आहेत, असे डॉ. राम पवनीकर यांनी सांगितले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.