आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सबस्टेशनलगतच्या केबलमध्ये बिघाड:बजाजनगरातील वीज गेल्याने सहा तास 10 हजार ग्राहक अंधारात

वाळूजएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

बजाजनगरात सोमवारी दुपारी चार वाजता अचानक वीज गुल झाली. त्यानंतर अधूनमधून १० मिनिटांसाठी वीज ये-जा करत होती. यासंदर्भात महावितरणच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता एमआयडीसी वाळूज येथील सबस्टेशनलगतच्या केबलमध्ये बिघाड झाल्याने वीजपुरवठा खंडित झाल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे भोंडवे पाटील पब्लिक स्कूल परिसर, छत्रपतीनगर, साईनगर, सिडको एलआयजी, एमआयजी आदी परिसरात राहणारे साधारण ७ ते १० हजार ग्राहक अंधारात हाेते. रात्री सव्वादहा वाजले तरीही वीजपुरवठा पूर्ववत झाला नव्हता.

बातम्या आणखी आहेत...