आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पेट्रोल दर:1,011 लोकांना मिळाले 54 रुपये लिटर दराने पेट्रोल ; क्रांती चौकातील पंपावर या उपक्रमाचे आयोजन

औरंगाबाद19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या ५४ व्या वाढदिवसानिमित्त मनसेतर्फे मंगळवारी (१४ जून) सकाळी ८ ते पावणे दहापर्यंत १,०११ जणांना ५४ रुपये लिटरप्रमाणे पेट्रोल देण्यात आले. मनसेचे जिल्हाध्यक्ष सुमीत खांबेकर यांनी क्रांती चौकातील पंपावर या उपक्रमाचे आयोजन केले होते. सध्या पेट्रोल ११३ रुपये लिटर आहे. त्यामुळे लिटरमागे ५९ रुपये मनसेतर्फे पंपचालकाला देण्यात आले. राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शहराध्यक्ष आशिष अविनाश सुरडकर यांच्यातर्फे प्रवीण विठ्ठल तरडे दिग्दर्शित सरसेनापती हंबीरराव सिनेमा २०० जणांना दाखवण्यात आला. शहराध्यक्ष गजन गौडापाटील यांनी जोहरीवाडा येथे गोमाता पूजन करून चारा वाटप केला. गजानन बाल अनाथ आश्रमात छत्र्यांचे वाटप करण्यात आले. या वेळी पक्षाचे राज्य प्रवक्ते प्रकाश महाजन, राज्य उपाध्यक्ष सतनामसिंग गुलाटी, जिल्हाध्यक्ष वैभव मिटकर यांच्यासह अनिकेत निलावार, अभय मांजरमकर, अमित दायमा, निखिल मालू, प्रल्हाद लहिरे, जॉन बोरगे, सुरेंद्र वाडेकर, मनोज भिंगारे, शुभम बोर्डे, सागर राजपूत, डॉ. संकेत देशमुख, प्रशांत आटोळे, शेखर रणखांब पाटील, रामकृष्ण मोरे, प्रतीक गायकवाड, अशोक पवार, प्रशांत जोशी, किरण जोगदंडे आदी उपस्थित होते. महानगर अध्यक्ष बिपिन नाईक, शहर सचिव राहुल पाटील, जिल्हा उपाध्यक्ष प्रशांत दहिवाडकर, मनविसे जिल्हाध्यक्ष संकेत शेटे, जिल्हा संघटक मनीष जोगदंडे, शहर उपाध्यक्ष किरण जोगदंडे, कृष्णा भुसारे, मुकेश मालोदे, मोहित पाटील आदींच्या उपस्थितीत भद्रा मारुती येथे महाआरती, अभिषेक करण्यात आला.

बातम्या आणखी आहेत...