आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विविध योजनांची माहिती:मेळाव्यात सर्वाधिक सुकन्या समृद्धीची 104 खाती उघडली

औरंगाबाद4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारतीय डाक विभागातर्फे केंद्र सरकारच्या ‘आर्थिक समावेशाद्वारे कन्नड तालुक्यातील वासडीजवळील देवपूळ गावामध्ये सक्षमीकरणाची मोहीम’योजनेअंतर्गत डाक महामेळावा घेण्यात आला. मेळाव्यात केंद्र सरकारच्या विविध योजनांची माहिती देऊन २६७ खाते उघडणयात आले.

या वेळी औरंगाबाद पोस्ट विभागाचे प्रवर डाक अधीक्षक अशोक धनवडे यांनी टपाल विभागाच्या विविध योजनांबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. कन्नड विभागाचे सहायक डाक अधीक्षक मनोज वांगे व पोस्टमास्तर जनरल कार्यालय औरंगाबादचे प्रवीण झोंड यांची विशेष उपस्थित होती.

मेळाव्यामध्ये सुकन्या समृद्धीचे १०४, आयपीपीबीचे ५०, बाल आधार ५०, टपाल जीवन विमाचे ५० असे एकूण २६७ नवीन खाती उघडण्यात आली.अध्यक्षस्थानी सरपंच पांडुरंग घुगे होते. प्रमुख पाहुणे म्हणून आप्पाराव घुगे यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक पुंडलिक काजे यांनी केले. मेळावा यशस्वी करण्यासाठी पोस्ट विभागाचे सुदाम जाधव, संजय पंडित, संजीवनी मुंडे, हर्षदा मोरे, वाल्मीक निकम, दीपक पंडित आदींनी सहकार्य केले. ग्रामविकास अधिकारी ए. डी. चव्हाण यांनी आभार मानले.

बातम्या आणखी आहेत...