आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजिल्ह्यात १ ते २५ जूनदरम्यान सरासरी १०४.३ मिमी अपेक्षित पर्जन्यमानाच्या तुलनेत १०८.९ मिमी म्हणजेच १०४.४ टक्के पाऊस पडण्याची नोंद झाली आहे. विशेषत: २४ सप्टेंबर रोजी सकाळी साडेआठ ते २५ सप्टेंबर सकाळी साडेआठ वाजेपर्यंत २४ तासांत हर्सूल मंडळात १०४ मिमी विक्रमी आणि करमाड ६५.२५ मिमी अतिवृष्टीची नोंद झाली. पैठण १३०.१ टक्के, गंगापूर १२८.७, वैजापूर ११५.४ आणि कन्नड ११३.५ टक्के विक्रमी पाऊस झाला. अाता खरीप पेरणीला वेग आला आहे. यंदा सरासरीइतका व त्यापेक्षा ५ टक्के जास्त पाऊस होण्याचे भाकीत हवामान विभाग, हवामान शास्त्रज्ञांनी वर्तवले आहे. आठ ते दहा दिवस अगोदर पाऊस दाखल होणार असल्याचेही सांगितले होते. प्रत्यक्षात हवामान बदलामुळे मान्सूनचा पाऊस दुसऱ्या पंधरवड्यात कमी तर तिसऱ्या पंधरवड्यात जोमाने दाखल झाला आहे. तसेच जेथे पोषक वातावरण तेथेच धो-धो पाऊस पडतो आहे. त्यानुसार पैठण, गंगापूर, वैजापूर आणि कन्नड तालुक्यात विक्रमी पाऊस झाला. औरंगाबादेत ९८.२ टक्के, खुलताबाद ९५, सिल्लोड ८०.५, सोयगाव ६२.८ सर्वात कमी आणि फुलंब्रीत ९३.४ टक्के सरासरी पेक्षा कमी पर्जन्यमानाची नोंद झाली आहे.
पावसासाठी अनुकूल वातावरण
मान्सूनच्या पावसासाठी अनुकूल वातावरण तयार झालेले आहे. जेथे आर्द्रता, हवेचा दाब, उष्णता, बाष्पयुक्त ढगांची गर्दी आदी पोषक वातावरण होतेय, तेथेच जोरदार पाऊस होईल. उर्वरित ठिकाणी हलका पाऊस पडेल. मोठ्या पावसाला हुलकावणी मिळेल, असे हवामान विभागाने म्हटले आहे.
खरीप पेरणीला वेग
जूनच्या पहिल्या पंधरवड्यात अत्यल्प पाऊस पडला होता. त्यामुळे खरीप पेरणी खोळंबली होती. मात्र, दुसऱ्या पंधरवड्यात जोरदार मान्सूनचे आगमन झाले आहे. सोयगाव व सिल्लोड वगळता सर्वत्र चांगला पाऊस पडतोय. त्यामुळे खरीप पेरणीला वेग आला आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.