आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रस्ताव:अनुदानासाठी 105 कॉलेजचे प्रस्ताव; माध्यमिक 10 शाळांच्या प्रस्तावांचा समावेश

औरंगाबाद11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना चांगल्या पायाभूत सुविधा मिळण्यासाठी प्रस्तावित असलेल्या शाळा-महाविद्यालयांना अनुदान मिळण्यासाठी शिक्षण उपसंचालक कार्यालयामार्फत पडताळणी करण्यात आली आहे. यात २० टक्के अनुदानाच्या प्राप्तीसाठी १०५ कनिष्ठ महाविद्यालये, माध्यमिक १० तर प्राथमिकच्या ६२ शाळांची प्रस्तावांची पडताळणी करण्यात आली आहे.

कनिष्ठ महाविद्यालय, उच्च माध्यमिक आणि माध्यमिकसह प्राथमिक शाळांना अनुदान मिळावे यासाठी विद्यार्थ्यांना भौतिक सुविधा असणे हा महत्त्वपूर्ण नियम आहे. या अनुषंगाने शिक्षण उपसंचालक कार्यालयास शासनाच्या वतीने २० टक्के अनुदानाच्या टप्प्यासाठी कनिष्ठ महाविद्यालयाचे वर्ग, तुकड्यांसाठी १०५, माध्यमिक शाळांचे १०, प्राथमिकच्या अनुदानासाठी ६२ शाळांचे प्रस्ताव आले होते.

२० टक्के अनुदानासाठी पडताळणी
या प्रस्तावांची संपूर्ण तपासणी करण्यासाठी शिक्षण उपसंचालकांतर्गत पडताळणी करण्यात आली. शाळेची जागा, विद्यार्थी संख्या, सुविधा यांचाही आढावा घेत प्रस्तावांची पडताळणी झाली. या पडताळणीतील पात्र शाळा-कनिष्ठ महाविद्यालयास शासन नियमानुसार २० टक्के अनुदान देण्यात येईल, अशी माहिती शिक्षण उपसंचालक अनिल साबळे यांनी दिली.

बातम्या आणखी आहेत...