आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराविश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या ६६ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आयोजित समता शांती पदयात्रेत यंदा १०५५ विद्यार्थी, रासेयो स्वयंसेवकांनी सहभाग घेतला हाेता. विशेष म्हणजे, कुलगुरू डॉ. प्रमोद येवले, प्र-कुलगुरू डाॅ. श्याम शिरसाट, कुलसचिव डाॅ. भगवान साखळेंसह चारही अधिष्ठातांनी पदयात्रेत अखेरपर्यंत पायी चालून सहभाग नोंदवला. सुमारे तीन ते चार किलाेमीटरनंतर रॅलीचा भडकल गेट येथे समारोप झाला.
विद्यापीठातील बाबासाहेबांच्या पूर्णाकृती पुतळयापासून रॅली सकाळी ८ : ३० वाजता सुरू झाली. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा जोतिबा फुले, राजर्षी शाहू महाराज यांच्या पुतळ्यांना कुलगुरू डाॅ. येवले यांनी अभिवादन केले. रॅलीत कमवा व शिका याेजनेच्या ३५० विद्यार्थ्यांनी सहभाग नाेंदवला हाेता. रासेयोचे १५०, तर १० कॉलेजचे प्रत्येकी ५० विद्यार्थी सहभागी झाले हाेते. संपूर्ण रॅलीत कुलगुरू पायी चालले. अधिष्ठाता डॉ. प्रशांत अमृतकर, डॉ. चेतना सोनकांबळे, डॉ. वाल्मीक सरवदे, डॉ. भालचंद्र वायकर, रासेयो संचालक डॉ. आंनद देशमुख, विद्यार्थी कल्याण संचालक डॉ. संजय सांभाळकर, डॉ. सतीश दांडगे, डॉ. विलास इप्पर, डॉ. प्रशांत पगारे सहभागी झाले होते. पंडित नेहरू महाविद्यालय, मिलिंद कला व विज्ञान महाविद्यालय, शासकीय विज्ञान संस्था, एम. पी. लॉ कॉलेज, वसंतराव नाईक महाविद्यालयाने स्वयंस्फूर्तपणे सहभाग घेतला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.