आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकुणाच्या उत्तरत्रिकेत पान फाटलेले, कुणाच्या उत्तरपत्रिकेत खाना-खुना तर कुठे मोबाइल नंबर लिहून प्लिज पास करा, देवा मला पास कर! तर पुष्पा.... झुकेगा नही.... चक्क चित्रपटातील डायलॉग लिहित दहावी-बारावीच्या उत्तरपत्रिकांमध्ये मजकूर आढळला. हा आधीच लिहिलेला की, नंतर याचा उलगडा शैक्षणिक बोर्ड करीत असून कर्स्यू रायटींगचा प्रकारही समोर आला आहे.
कर्स्यू रायटींगचा प्रकार उघड
यासंदर्भात बोर्डाने परिक्षार्थ्यांना नोटीस दिल्या होत्या. त्यांची मंगळवारपासून आक्षेपार्ह लेखनप्रकरणी सुनावणी सुरू आहे. या दरम्यान चक्क उत्तरपत्रिकेच्या शेवटच्या आणि विद्यार्थ्यांनी मध्येच उत्तर लिहिणे सोडलेल्या प्रश्नाचे उत्तर चक्क कर्स्यू रायटिंग मध्ये लिहिण्यात आले असून, हे आमचे अक्षर नाही. कसे आले कुणास ठाऊक याचा शोध बुधवारीही विभागीय मंडळाच्या विद्यार्थी सुनावणी दरम्यान दिसून आला.
अहवालानंतर समिती घेईल निर्णय
आता १३ मे पर्यंत झालेल्या सुनावणी नंतर तदर्थ समिती समोर अहवाल ठेवून पुढील निर्णय घेतला जाणार असल्याचे विभागीय शिक्षण मंडळातील अधिकाऱ्यांनी सांगितले. तसेच उत्तरपत्रिकेतील आक्षेपार्हय लेखनावरील सुनावणी हा नियमित भाग असल्याचा पावित्राही त्यांनी घेतला. मात्र उत्तरपत्रिकेत अक्षर बदल झाले कसे हे अजूनही कळू शकलेले नाही. त्यामुळे मॉडरेटरमुळे उघडकीस आलेल्या या प्रकारावर आता उत्तरपत्रिका तपासाणारे शिक्षक, केंद्रसंचालक, मॉडरेटर यांची देखील चौकशी होवू शकते. असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
केज, अंबाजोगाईच्या विद्यार्थ्यांचे अक्षरबदल
शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेत आक्षेपार्हय लिखाण करणाऱ्या विद्यार्थ्यांची सुनावणी १३ मे पर्यंत करण्यात येत आहे. यात मंगळवार दि. ९ रोजी अंबाजोगाई, पैठण, केज येथील काही मुलांच्या उत्तरपत्रिकेत हस्ताक्षर बदल असल्याचे आढळून आल्याने त्यांना सुनावणीसाठी बोलवण्यात आले असून, यामुळे खळबळ उडाली आहे.
एवढे राहीले हजर
बुधवारी पुन्हा या प्रकारात ७४ जणांना सुनावणीसाठी बोलवण्यात आले होते. त्यापैकी ७१ हजर राहिले. तर आक्षेपार्ह्य लेखन करणाऱ्यांची एकूण संख्या ५०० आहे. या मुलांच्या सुनावणीवरुन नेमका प्रकार कुठे का? आणि कोणी केला याचा शोध घेणे सुरु असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. या सर्वांमध्ये मात्र विद्यार्थ्यांच्या मते यात आम्ही दोषी नाही. कुणी लिहिले माहिती नाही. आम्ही तर कर्स्यू लिहित नाही असे विद्यार्थ्यांनी सांगितले. त्यामुळे आता हा प्रकार झाला कुठे याचे उत्तर विभागीय मंडळाकडून शोधले जात आहे.
अशी होतेय विद्यार्थी सुनावणी
हा पेपर तुमचा आहे का? यातील हस्ताक्षर तुमचे आहे की नाही ?तुमच्यावर आक्षेपार्हय लेखन, पान फाडले आहे का? तुमच्या सोबत पालक आले आहेत की नाही ? तुम्हाला गुन्हा मान्य आहे का नाही? असे प्रश्न विचारून विद्यार्थ्यांचे मत नोंदविले जात आहे.
उत्तर पत्रिकेची प्रक्रिया
केंद्रावर पेपर झाल्यानंतर केंद्रसंचालक सर्व उत्तरपत्रिकांची नोंद घेत मोजून कस्टोडियनकडे पाठवतो. त्यानंतन मुख्याध्यापक, कनिष्ठ महाविद्यालयाचवे प्राचार्य यांच्याकडे उत्तरपत्रिका जावून ते तपासणीसाठी शिक्षकांना देतात. शिक्षकांकडून तपासणी झाल्यावर पुन्हा मॉडरेटरकडून बोर्डाकडे येतात.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.