आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खळबळजनक:320 विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिकेत अक्षरबदल; एकाच दिवशी 87 विद्यार्थी सुनावणीसाठी बोर्डात दाखल

छत्रपती संभाजीनगर21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

दहावी, बारावीच्या बोर्ड परीक्षेचा निकाल दृष्टीक्षेपात येत असतानाच या परीक्षेतील गैरप्रकाराचे एक - एक प्रकरणे समोर येत आहेत. इयत्ता बारावीच्या भौतिकशास्त्र विषयाच्या उत्तरपत्रिकेत अक्षर बदल आढळून आल्याच्या कारणावरून शेकडो विद्यार्थ्यांना महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या छत्रपती संभाजीनगर येथील विभागीय कार्यालयाने पाचारण केल्याने एकच खळबळ उडाली आहे.

३२० विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिकेत अक्षरबदल

३२० विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिकेत अक्षर बदल आढळून आला असून, दररोज ८० विद्यार्थ्यांची बोर्डात सुनावणी होणार आहे. ही सुनावणी चार दिवस चालणार आहे. बोर्डाने पहिल्या दिवशी पाचारण केलेले विद्यार्थी हे अंबाजोगाई येथील योगेश्वरी व तेथीलच यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाचे समोर आले आहे. या विद्यार्थ्यांची वर्ग -२ च्या अधिकार्‍यासमोर ही सुनावणी होत आहे.

पहिल्या दिवशी ८७ विद्यार्थी दाखल

पहिल्याच दिवशी ८७ विद्यार्थी बोर्डात दाखल झाले आहेत. या विद्यार्थ्यांसोबतच पालकही आल्याने विभागीय कार्यालयात आज गर्दी आढळून आली. सुनावणीसा'ी आलेल्या काही विद्यार्थी व पालकांशी प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींनी संवाद साधला असता त्यांनी सांगितले की, विभागीय बोर्डाचे अचानक महाविद्यालयाला पत्र आले. त्यात संबंधित विद्यार्थ्यांच्या भौतिकशास्त्र (फिजिक्स) विषयाच्या उत्तरपत्रिकेत अक्षर बदल व शाईबदल दिसून येत आहे.

शाईमध्ये फरक

या विद्यार्थ्यांनी संबंधित उत्तरपत्रिकेवरील बदल झालेले अक्षर आमचे नाही, असे बोर्डाच्या अधिकार्‍यांना सांगितले. उत्तरपत्रिकेच्या तपासणीत काही विद्यार्थ्यांच्या लेखनात प्रश्नपत्रिकेशी संबंधित मजकुराऐवजी अन्य बाबी आढळून आल्या आहेत. जशा की मोबाईल फोन नंबर वगैरे. शाईमध्येही फरक दिसून आला.

विद्यार्थ्यांचे लेखी म्हणणे बोर्डाने नोंदवले

अशा किंवा ज्यांच्यावर परीक्षेदरम्यान कॉपी आदी संबंधित कारवाई करण्यात येते अशांना मंडळाकडून पाचारण केले जाते व चौकशी केली जाते. पैकी अक्षर बदलाशी संबंधित कारणांतर्गत विद्यार्थ्यांना बोलावण्यात आले. त्यांचे लेखी म्हणणे बोर्ड घेत आहे, असे एका वरिष्ट अधिकार्‍याने पत्रकारांशी बोलताना सांगितले.