आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

10-12 वी बोर्डाच्या परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांना दिलासा:सवलतीच्या गुणांसाठी 50 ऐवजी घेणार 25 रुपये शुल्क

औरंगाबाद3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

कला व क्रीडाअंतर्गत मिळणाऱ्या सवलतीच्या गुणांसाठी विद्यार्थ्यांना प्रत्येकी 50 रुपये शुल्क आकारण्याबाबत बोर्डाने आदेश जारी केला होता. विद्यार्थ्यांना पात्रता सिद्ध करण्यासोबतच शुल्क भरुन सवलतीचे गुण विकत घ्यावे लागणार याबाबत कला क्रिडा शिक्षक संघटनांनी विरोध दर्शविला होता.

शासनाने आता कला क्रीडा प्रकाराचे प्रस्ताव तपासण्यासाठी 50 ऐवजी 25 रुपये शुल्क आकारण्यात येईल, असा आदेश जारी केले आहेत. या निर्णयामुळे आता काही प्रमाणात विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार आहे.

माध्यमिक आणि उच्च माध्यमि शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या दहावीच्या परीक्षा या मार्च मध्ये होणार आहेत. तर बारावीच्या परीक्षा या फेब्रुवारीमध्ये सुरू होणार आहेत. या परीक्षेत बसणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये जे विद्यार्थी विद्यार्थी दहावी, बारावीत शास्त्रीय कला (गायन, वादन, नृत्य), चित्रकला, लोककला तसेच खेळाडू, एनसीसी, स्काऊट व गाइड प्रकारात सहभागी होतात, त्यांना सवलतीच्या अतिरिक्त गुणांसाठी प्रस्ताव दाखल करण्यासाठी 50 रुपये शुल्क मंडळामार्फत आकारण्यात आले होते. त्यांच्या कला गुणांना वाव देण्याऐवजी बोर्डाकडून शुल्क आकारले जात असल्याने कला व क्रीडा शिक्षकांनी नाराजी व्यक्त केली होती. याची दखल घेत बोर्डाने कला क्रीडा विषयासाठी प्रस्ताव दाखल करण्यासाठी 50 ऐवजी 25 रुपये शुल्क आकारण्याचे जाहीर केले आहे. मात्र नियमित परीक्षा शुल्क जर विद्यार्थी भरत असतील. तर असे वेगळे शुल्क आकारण्याची काय गरज आहे.

एकीकडे विद्यार्थ्यांनी कला, क्रीडांमध्ये सहभागी व्हावे. त्यासाठी त्यांना प्रोत्साहन देण्यात यावे. यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत असतांना मात्र अशा प्रकारे पुन्हा कला, क्रीडा क्षेत्रात नाम कमवणाऱ्या विद्यार्थ्यांना वेगळे शुल्क आकारुन वेगळी वागणूक का असा सवालही संघटनांनी केला होता. त्यानंतर आता ही शुल्क 50 रुपये ऐवजी 25 रुपये करण्यात आली आहे.

बातम्या आणखी आहेत...