आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दहावी-बारावीच्या परीक्षा शुल्कात 25 ते 30 रुपयांची वाढ:पात्रता प्रमाणपत्र शुल्क दुपटीने वाढ, शिक्षण मंडळाचा निर्णय

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने यावर्षी दहावी-बारावीच्या परीक्षा शुल्कात प्रत्येकी 25 ते 30 रुपयांची वाढ केली आहे. याआधी दहावीच्या विद्यार्थ्यांकडून (प्रात्यक्षिक परीक्षेसह) 415 रुपये तर बारावीच्या विद्यार्थ्यांकडून 435 रुपये शुल्क आकारण्यात येत होते, मात्र यंदाच्या वर्षी त्यात वाढ करण्यात आली आहे.

शिक्षण मंडळाने निकालानंतर विद्यार्थ्यांना देण्यात येणारी गुणपत्रिका आणि प्रमाणपत्राच्या लॅमिनेशनसाठी यंदा प्रत्येकी 20 रुपये आकारले असल्याने परीक्षा फीमध्ये वाढ झाली आहे. याआधी दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांकडून त्यासाठी केवळ दहा रुपये आकारण्यात येत होते. दहावी-बारावीचे परीक्षा शुल्क अनुक्रमे 375 आणि 400 रुपये इतके आहे. त्याचबरोबर प्रशासकीय शुल्कासाठी प्रत्येकी 10 रुपये आणि दहावी, बारावीच्या प्रात्यक्षिक परीक्षेसाठी प्रत्येकी 10 रुपये असे आकारण्यात आले आहे.

एलिजिबिलिटी प्रमाणपत्र शुल्क दुपटीने वाढ

बारावीची परीक्षा देणाऱ्या बिगर एसएससी विद्यार्थ्यांकडून एलिजिबिलिटी प्रमाणपत्रासाठी पूर्वी तीनशे रुपये घेतले जात होते, यंदा त्यासाठी पाचशे रुपये आकारण्यात येत आहे. तसेच परीक्षा अर्ज शुल्क 100 वरून 200 रुपये असे दुप्पट करण्यात आले आहे. यासह दहावीच्या टेक्निकलच्या प्रत्येक विषयासाठी 100 रुपये या प्रमाणे शुल्क आकारण्यात येणार आहे. तर बारावीच्या माहिती व तंत्रज्ञानच्या प्रतिविषयाठी दोनशे रुपये शुल्क आकारले जाणार आहे.

परीक्षेसंबंधीच्या अडचणी जाणून घेण्यासाठी बैठक

दरम्यान विभागीय शिक्षण मंडळाच्या वतीने केंद्रप्रमुख, मुख्याध्यापकांची बैठक आयोजित करण्यात आली होती. यात परीक्षेच्यावेळी येणाऱ्या अडचणींसंबंधी चर्चा करण्यात आल्याचे विभागीय कार्यालयाच्या वतीने सांगण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...