आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामहाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या दहावी-बारावीच्या परीक्षा फेब्रुवारी-मार्च महिन्यात घेण्यात आल्या. आतापर्यंत दहावी आणि बारावीच्या मिळून २३ लाख १६ हजार ३१६ उत्तरपत्रिकांची तपासणी पूर्ण झाली आहे. अर्थात तपासणी प्रक्रिया शंभर टक्के पूर्ण झाली. त्यामुळे वेळेत निकाल लावण्यासाठीचे प्रयत्न मंडळकाकडून सुरू आहेत.
राज्य मंडळाच्या वतीने फेब्रुवारी महिन्यात बारावीच्या तर मार्च मध्ये दहावीच्या परीक्षांना सुरुवात झाली होती. या परीक्षा सुरु झाल्यानंतर उत्तरपत्रिका तपासणीवर संघटनांनी बहिष्कार टाकला होता. त्यामुळे परीक्षा सुरु होवून पंधरा दिवस उलटले तरी उत्तरपत्रिका तपासणीला सुरुवात झाली नव्हती. त्यामुळे निकालावरर परिणाम होईल की काय? अशी स्थिती होती. परंतु अधिकचा वेळ देवून बहिष्कार टाकणाऱ्या संघटनेतील शिक्षकांनी देखील उत्तरपत्रिका तपासणीसाठी सहकार्य केल्याने शंभर टक्के तपासणीचे काम पूर्ण झाले आहे. आता तपासणीनंतरची पुढील प्रक्रिया सुरु करण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
दहावी बारावीच्या उत्तरपत्रिका तपासणीचे काम शंभर टक्के पूर्ण झाले आहे. आता उत्तरपत्रिका तपासणी प्रक्रिया पूर्ण झाली असतील तरी इतर काही कामांची प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी पंधरा ते वीस दिवसांचा कालावधी लागतो. सर्व विभागांच प्रक्रिया पूर्ण होताच निकाल जाहिर करण्यात येतो. त्यामुळे यंदा बहिष्कारानंतर जरी उत्तरपत्रिका तपासणीची प्रक्रिया सुरु झाली असली तरी निकाल वेळेत लागेल अशी माहिती बोर्डातील अधिकाऱ्यांनी दिली.
अशी आहे परीक्षार्थींची संख्या
दहावी - १ लाख ६२ हजार तर बारावीचे १ लाख २७ हजार ७२ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. दरम्यान परीक्षेच्या काळात जे विद्यार्थी गैर प्रकारात आढळून आले होते त्यांची सुनावणी पूर्ण झाली असून त्यांचा निकाल राखीव ठेवण्यात येईल, तदर्थ समिती समोरील अहवालानुसार त्यांच्यावर कार्यवाही केली जाणार आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.