आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दहावी - बारावी परीक्षार्थ्यांसाठी मोठी बातमी:उत्तरपत्रिका लिहिण्यापूर्वी मंडळकाकडून 22 नियमांच्या सूचना जारी

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या दहावी आणि बारावीच्या परीक्षांसाठीची लगबग आता वेगाने सुरु झाली आहे. या अनुषंगाने आता राज्य मंडळाने उत्तरपत्रिका लिहिण्यापूर्वीच काही नियम आखून दिले आहेत. ज्यात विद्यार्थ्यांनी परीक्षेला सामोरे जात असतांना प्रत्येक पानाच्या दोन्ही बाजूस लिहायचे असून, उत्तरपत्रिका किंवा पुरवणीचे कोणतेही पान फाडू नये. फाडल्यास परीक्षार्थी शिक्षकेस पात्र ठरले. असा नियम जारी केला आहे.

बारावीची परीक्षा 21 फेब्रुवारी ते 1 मार्च या कालावधीत तर दहावीची परीक्षा 2 मार्च ते 25 मार्च या कालावधीत होणार आहे. या पार्श्वभूमीवर परीक्षेसंदर्भातील विद्यार्थ्यांसाठीच्या उत्तरपत्रिका लिहिण्यापूर्वीच्या सूचना जारी करण्यात आल्या आहेत. विद्यार्थ्यांसाठी उत्तरपत्रिका लिहिण्यापूर्वीच्या सूचना परिपत्रकाद्वारे मुख्याध्यापक, कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य यांना दिल्या आहेत. त्यानुसार विद्यार्थ्यांनी सकाळच्या सत्रामध्ये 10:30 वाजेपर्यंत, तर दुपारच्या सत्रातील परीक्षेसाठी 2:30 वाजेपर्यंत परीक्षा कक्षात पोहचावे लागणार आहे.

गेल्या वर्षी कोरोना प्रादुर्भावामुळे राज्य मंडळाने विद्यार्थ्यांना काही सवलती दिल्या होत्या. त्यात शाळा-कनिष्ठ महाविद्यालयातच परीक्षा केंद्र, परीक्षेसाठी पंधरा मिनिटे ते अर्धा तास अतिरिक्त वेळ आदींचा समावेश होता. यंदा मात्र नियमित पद्धतीने परीक्षा होणार असल्याने या सवलती रद्द करण्यात आल्या आहेत. तसेच बहुतांश विद्यार्थी हे दोन वर्षानंतर थेट दहावी तर काही थेट बारावीचीच परीक्षा देणार असल्याने उत्तरपत्रिका लिहिण्यापूर्वी विद्यार्थ्यांकरिता सूचना जारी करण्यात आल्या आहेत.

उत्तरपत्रिका लिहिण्यापूर्वीच्या सूचना

परीक्षा दालनात परीक्षार्थ्यास पर्यवेक्षकाकडून बारकोड स्टिकर मिळाल्यानंतर विषय, बैठक क्रमांक याची खात्री करुन उपस्थिती पत्रकावर क्रमांक, बारकोड स्टिकर लिहून स्वाक्षरी करावी. स्टिकर काळजीपूर्वक दिलेल्या जागेवरच चिकटवावे.

परीक्षार्थीने उत्तराचा काही भाग खोडल्यास शिवाय त्यात शाईत बदल करावा लागला, कोरा भाग सोडल्यामुळे त्या ठिकाणी निळ्या,काळ्या शाईने रेघ मारली असेल अशा ठिकाणी पर्यवेक्षकाची स्वाक्षरी घेऊ नये

उत्तरपत्रिकेवर निळ्या अथवा काळ्या शाईचा वापर करावा अन्यथा मजकुरास गुणदान केले जाणार नाही.

थेट 2 वर्षांनी परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचे

''काही विद्यार्थी हे थेट दहावी तर काही थेट बारावी अशा दोन वर्षानंतर परीक्षांना सामोरे जाणार आहेत. वरवरची माहिती सर्वांना असते. परंतु उत्तरपत्रिका लिहितांना नेमक्या काय चुका करू नयेत. याची माहिती विद्यार्थ्याना असावी. या उद्देशाने या सूचना विद्यार्थ्यांना देण्यात आल्या आहेत. ज्यात महत्त्वपूर्ण काही नव्याने बदलही मंडळाने केले आहेत. - एन. जी. गायकवाड देवगिरी महाविद्यालय उपप्राचार्य.

बातम्या आणखी आहेत...