आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुरवणी परीक्षा:दहावी-बारावी पुरवणी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर; मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर देण्यात आलेले वेळापत्रकच ग्राह्य धरावे

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या दहावी आणि बारावी पुरवणी परीक्षेचे वेळापत्रक शुक्रवारी राज्यमंडळाने जाहीर केले. या वेळापत्रकानुसार, माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (दहावी) लेखी परीक्षा 22 सप्टेंबर ते 8 ऑक्टोंबर दरम्यान होईल. तर बारावीची जुना आणि पुर्नरचित अभ्यासक्रमाची लेखी परीक्षा 16 सप्टेंबर ते 11 ऑक्टोंबर आणि व्यावसायिक अभ्यासक्रमाची परीक्षा ही 16 सप्टेंबर ते 8 ऑक्टोंबर दरम्यान होणार आहे.

याबरोबरच दहावीची प्रात्याक्षिक श्रेणी, तोंडी परीक्षा ही 21 सप्टेंबर ते 4 ऑॅक्टोंबर आणि बारावीची प्रात्याक्षिक परीक्षा ही 15 सप्टेंबर ते 4 ऑक्टोंबर दरम्यान होईल असे राज्यमंडळाचे सचिव डॉ.अशोक भोसले यांनी पत्राद्वारे कळवले आहे. परीक्षेचे सविस्तर वेळापत्रक विद्यार्थांना मंडळाच्या www.mahahsscboard.in संकेतस्थळावर पाहता येईल असेही राज्यमंडळाने म्हटले आहे.

मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरील वेळापत्रक ग्राह्य धरावे
विद्यार्थ्यांनी समाजमाध्यम अथवा तत्सम माध्यमातून व्हायरल झालेल्या वेळापत्रकास ग्राह्य धरु नये. मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर देण्यात आलेल्या वेळापत्रकावरुनच खात्री करावी असे आवाहन मंडळाने केले आहे.

बातम्या आणखी आहेत...