आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबारावीची २१ फेब्रुवारी, तर दहावीची लेखी परीक्षा २ मार्चपासून सुरू झाली अाहे. परंतु, केंद्रांची पाहणी करून केंद्र दिल्याचा दावा करणाऱ्या मंडळाने काही केंद्रांवर विद्यार्थी संख्या अधिक दिल्याने दहावी आणि बारावी या दोन्ही वर्गाचे पेपर एकाच दिवशी अाणि एकाच वेळी येत आल्याने केंद्र संचालक आणि मुख्याध्यापकांची चांगलीच तारांबळ असल्याचे मुख्याध्यापकांनी सांगितले.
छत्रपती संभाजीनगरातून दहावीला १ लाख ७९,२३७, तर बारावीसाठी पावणेदोन लाख विद्यार्थी बसले आहेत. ६ मार्च रोजी दहावीचा इंग्रजी, तर बारावीचा सहकार विषयाचा पेपर सकाळी ११ ते २ यावेळेत होणार आहे. हे दाेन्ही पेपर एकाच वेळी हाेणार असल्याने विद्यार्थ्यांनादेखील मनस्ताप हाेणार अाहे. १७ मार्चला दहावीचा विज्ञान एक आणि बारावीचा भूगोल विषयाचा पेपर ११ ते २ या वेळेत होणार आहे. काही केंद्रांवर आसन क्षमता कमी असल्याने तेथे एकाच वेळी एकाच विषयाची परीक्षा होऊ शकते. तर काही केंद्रांवर दहावी आणि बारावी असे दोन्ही केंद्र आहेत. पालकांचीही केंद्रांवर गर्दी वाढणार असल्याने अडचण होऊ शकते. यासंदर्भात विभागीय शिक्षण मंडळातील अधिकाऱ्यांना विचारणा केली असता, आसन व्यवस्थेत काही अडचण येणार नाही. कारण, अधिकची संख्या असल्याचे २०० प्रस्ताव शाळांचे होते. त्यांना उपकेंद्र दिले आहेत. त्यामुळे आसन व्यवस्थेला काहीच समस्या येणार नाही, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.