आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

परीक्षा:दहावी-बारावी सीबीएसई परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, सुधारीत वेळापत्रक सीबीएसईच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध

औरंगाबादएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (सीबीएसई) घेण्यात येणाऱ्या दहावी-बारावी परीक्षेच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. सुधारीत वेळापत्रक सीबीएसईच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले आहे.

सुधारीत वेळापत्रकानुसार बारावीचा १३ मे रोजी होणारा फिजिक्सचा पेपर आता ८ जूनला घेण्यात येणार आहे. तसेच इतिहास आणि बँकिंग विषयाच्या परीक्षांमध्येही बदल करण्यात आला आहे. दहावीचा विज्ञान आणि गणित या दोन विषयांच्या पेपरच्या तारखांमध्ये देखील बदल करण्यात आला आहे. सुधारीत वेळापत्रकानुसार दहावीचा विज्ञानाचा पेपर २१ मे आणि गणिताचा पेपर २ जूनला घेण्यात येणार आहे. बोर्डाने कला शाखेसाठीही वेळापत्रकात बदल केला असून २ जूनला घेण्यात येणारा भूगोलचा पेपर आता तीन जूनला घेतला जाणार आहे. सीबीएसई दहावी-बारावीची परीक्षा ४ मे पासून सुरू होणार आहे. त्यानंतर दहावीची परीक्षा ७ जून; तर बारावीची परीक्षा ११ जूनला संपणार आहे.

1 मार्चपासून शाळांद्वारे प्रात्यक्षिक परीक्षा घेण्यात येत आहे. ऑनलाईनमुळे विद्यार्थ्यांवर आभ्यासाचा ताण पडला आहे. हा ताण कमी करण्यासाठी सीबीएसई बोर्डाने यंदा अभ्यासक्रमात ३० टक्के कपात केली आहे. यंदा परीक्षेत ३३ टक्के प्रश्न इंटरनल चॉइस प्रकारचे असणार आहे. परीक्षा ऑफलाइन होणार असल्यामुळे विद्यार्थ्यांनी परीक्षेला हजर राहताना कोरोना सुरक्षाविषयक नियमांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या परीक्षेचा निकाल १५ जुलैपर्यंत जाहीर करण्यात येणार आहे.

बातम्या आणखी आहेत...