आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकिराडपुरा भागात झालेल्या दंगलीतील विशेष तपास पथकाने आणखी १४ जणांच्या मुसक्या आवळल्या. त्यातील ११ जणांना ६ एप्रिलपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे, तर तिघांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्याचे आदेश प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी आर. व्ही. सपाटे यांनी २ एप्रिल रोजी दिले.
शेख अझहर शेख मझहर (२८, रा. रहेमानिया कॉलनी), शेख समीर शेख मुनीर (२३, रा. गल्ली क्र. ११, संजयनगर), शेख समीर शेख हसन (२२, रा. कटकट गेट), तालेब खान साजेद खान (२६, रा. किराडपुरा), सय्यद अलीम सय्यद शौकत (३२, रा. किराडपुरा), सोहेल खान कबीर खान (२४, रा. गल्ली क्र. १९, बायजीपुरा), सय्यद सद्दाम सय्यद जकी (२३, रा. यासिननगर, हर्सूल), शेख मोहसीन शेख जाफर (३३, रा. गल्ली क्र. ३४, बायजीपुरा), शेख असद शेख अश्पाक (२१, रा. नेहरूनगर), शेख रियाज शेख जहूर (३५, रा. गल्ली क्र. ९, बायजीपुरा) आणि सय्यद शोएब सय्यद शफिक (३८, रा. रहेमानिया कॉलनी) अशी पोलिस कोठडी मिळालेल्या आरोपींची नावे आहेत. सय्यद बाबर सय्यद कफिलोद्दीन (३०, रा. किराडपुरा), मोहंमद इलियास ऊर्फ इल्ली जहूर (३६, रा. चमचमनगर, नारेगाव) आणि मोहंमद नासेर ऊर्फ इन्ता मोहंमद फारुक (३१, रा. नूर कॉलनी, भडकल गेट) या आरोपींची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली.
गुन्हा गंभीर स्वरूपाचा आहे. आरोपींचे आणखी कोण साथीदार आहेत याबाबत चौकशी करायची आहे. गुन्ह्यात वापरलेल्या लाठ्या-काठ्या, सळया जप्त करायचे आहेत. त्याचप्रमाणे गुन्हा करण्यामागे आरोपींचा नेमका हेतू काय होता याचादेखील तपास बाकी असल्याने आरोपींना सात दिवसांची पोलिस कोठडी देण्याची विनंती जिन्सी पोलिस ठाण्याचे सहायक निरीक्षक ए. बी. मगरे यांनी न्यायालयाकडे केली. त्यानंतर न्यायालयाने वरीलप्रमाणे आदेश दिले.
दंगलीची न्यायालयीन चौकशी करा ; खासदार इम्तियाज जलील यांनी केली मागणी
छत्रपती संभाजीनगर | किराडपुऱ्यातील दंगल नियंत्रणात अाणण्यात राज्य सरकार व पोलिस पूर्णपणे अपयशी ठरले आहेत. जिल्ह्यातील तीन व केंद्रातील दाेन मंत्री बेताल वक्तव्ये करत आहेत. माझा सरकारवर विश्वास राहिलेला नाही. त्यामुळे मी न्यायालयीन चौकशीची मागणी केली आहे, अशी माहिती खासदार इम्तियाज जलील यांनी दिली.
दंगलीच्या पार्श्वभूमीवर राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. खासदार इम्तियाज यांनी राज्य सरकार व पोलिसांवर ताशेरे ओढत न्यायालयीन चौकशीची मागणी केली आहे. ते म्हणाले, मी १४ दिवस लोकशाही मार्गाने शांततेत आंदोलन केले, तर माझ्यावर गुन्हे दाखल करण्यात आले. दुसरीकडे मंत्री अतुल सावे व पालकमंत्री संदिपान भुमरे यांनी परवानगी नसताना रॅली काढली. त्यांच्यावर पाेलिसांनी कारवाई केली नाही. ज्या राज्य सरकारवर दंगल अाटाेक्यात अाणण्याची जबाबदारी होती त्यांनी दंगल हाेऊ दिली. त्या रात्री केंद्रीय मंत्री डाॅ. भागवत कराड घरात झोपले होते. दुसऱ्या दिवशी बेताल वक्तव्ये करत होते. सरकार व पोलिसांच्या या दुटप्पी धोरणामुळे माझा सरकारवर विश्वास राहिलेला नाही. पाेलिस कोणाच्या इशाऱ्यावर काम करत आहेत, असा सवालही त्यांनी केला. उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांमार्फत चौकशी केल्यास सर्व सत्य समोर येईल, असे इम्तियाज म्हणाले.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.