आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशहरात दिवसेंदिवस गोवर साथीचा उद्रेक वाढत चालला आहे. चिकलठाणा, नेहरूनगर, विजयनगर, बायजीपुरा, भवानीनगर या पाच भागात गोवरच्या संशयित बालकांचा उद्रेक झाला.आतापर्यंत ११४ बालके आढळून आली आहेत. मंगळवारी गोवर साथीचे आणखी ११ संशयित बालके निघाल्यामुळे हा आकडा १२५ वर पोहोचल्याने आरोग्य विभागाची चिंता वाढली आहे. १५ दिवसात गोवर बालकांची संख्या शंभरच्या वर पोहोचली आहे. मंगळवारी नेहरूनगर भागात ३, नारेगाव भागात ४ आणि सातारा, जवाहर कॉलनी, मिसारवाडी, हर्सूल भागात प्रत्येक १ याप्रमाणे ११ संशयित बालके आढळून आली. अकरा ठिकाणी अतिरिक्त लसीकरण सत्र राबवण्यात आले असून ९ महिने ते ५ वर्षे वयोगटातील १५२ बालकांना अतिरिक्त लसीचा डोस देण्यात आला. या वेळी आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पारस मंडलेचा, वैद्यकीय अधिकारी डॉ. उज्ज्वला भांमरे, डॉ. संध्या नलगीरकर, डॉ. अर्चना राणे आदींनी सर्वेक्षण केले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.