आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबाद:विद्यापीठातील 11 अभ्यासक्रम बंद, विद्यार्थ्यांची वानवा असल्याने व्यवस्थापन परिषदेने घेतला निर्णय

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील विविध अभ्यासक्रमांसाठी विद्यार्थी प्रवेश घेण्यास इच्छुक नसल्याने ११ अभ्यासक्रम कायमस्वरूपी बंद करण्याचा निर्णय विद्यापीठाने घेतला आहे. विद्यापीठाच्या ६३ व्या वर्धापनदिनी कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांच्या अध्यक्षतेत झालेल्या बैठकीत व्यवस्थापन परिषदेने यावर शिक्कामाेर्तब केले. काही विभाग इतर विभागात विलीन केले आहेत. ५ शैक्षणिक वर्षामध्ये क्षमतेपेक्षा कमी प्रवेश झालेले अभ्यासक्रम बंद केले आहेत. विभागप्रमुखांनी यापूर्वी अनुमती दिल्याने व्यवस्थापन परिषदेत ११ अभ्यासक्रम बंद करण्याचा निर्णय घेतला. यात एमएस्सी (मॅथेमॅटिक्स), एमटेक इंजिनिअरिंग (कॉम्प्युटर सायन्स अ‍ँड इंजिनिअरिंग), डिप्लोमा इन बिझनेस मॅनेजमेंट (डीबीएम), सर्टिफिकेट कोर्स आॅफ प्रोफीसेन्सी एन रशियन, बीए इंटरनॅशनल (जर्नालिझम अ‍ँड आर्ट अ‍ँड सायन्स युनिस्को कोर्स), बीएड, एमएड इंटिग्रेटेड कोर्स, डिप्लोमा इन टीव्ही प्रोडक्शन अ‍ँड बेसिक फिल्म मेकिंग, बॅचलर आॅफ डान्स, बीए (म्युझिक), बॅचलर आॅफ प्रिंटिंग टेक्नॉलॉजी अ‍ँड ग्राफिक्स आर्ट (बीपीटी अ‍ँड जीए), एमएस्सी नॅनो टेक्नॉलॉजी या अभ्यासक्रमाचा समावेश आहे. तर काही अभ्यासक्रमांच्या प्रवेश क्षमता कमी करण्याबरोबरच अन्य अभ्यासक्रमांत विलीन करण्याचा निर्णय घेण्यात आला.

चार नवीन अभ्यासक्रम सुरू होणार
जुने अभ्यासक्रम बंद करणे, प्रवेश क्षमता कमी करण्याबरोबरच काही नवीन कोर्स शैक्षणिक वर्ष २०२१-२२ मध्ये सुरू करता येतील का? यासंदर्भात चर्चा करण्यात आली. एमएस्सी इन फॉरेन्सिक सायन्स, एमएस्सी इन आर्टीफिशियल इन्टेलिजन्स, एमएस्सी इन हॉटेल मॅनेजमेंट अ‍ँड केटरिंग, डिप्लोमा इन टॅक्सेशन लॉ (डीटीएल) हे अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहेत.

बातम्या आणखी आहेत...