आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिरसाट पॅनलचे 17 पैकी 11 उमेदवार विजयी:दीड वर्षांनंतर वडगावला मिळाला 'सरपंच', काळे सरपंच: ज्योती साळे बिनविरोध

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तब्बल दीड वर्षांच्या प्रतीक्षेनंतर बजाजनगर-वडगाव कोल्हाटी ग्रामपंचायतवर 'प्रशासक राज'चा पाय उतार होऊन 'सरपंच राज' आले. आमदार संजय शिरसाट यांच्या 'हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ग्रामविकास पॅनलचे' 17 पैकी 11 सदस्य निवडून आल्यानंतर आज 7 ऑक्टोबर रोजी सर्वानुमते निर्विवादपणे सुनील काळे यांची सरपंच तर, ज्योती साळे यांची उपसरपंचपदी निवड करण्यात आली.

वडगाव ग्रामपंचायतवर सन 2016 मध्ये निवडून आलेल्या कार्यकारणीचा कार्यकाळ 4 एप्रिल 2021 रोजी संपुष्टात आला. मात्र, कोरोनाचे संकट असल्याने निवडणुका घेण्यात न आल्याने ग्रामपंचायतवर तेव्हा पासून आज तब्बल दीड वर्ष प्रशासक कामकाज पाहत होते. दरम्यान ग्रामपंचायतच्या निवडणूका पार पडल्या त्यात आमदार शिरसाट यांच्या गटाचे 17 पैकी 11 तर शिवसेनेचे 4 आणि भाजपाचे दोन सदस्य निवडून आले होते. सरपंचपदाचे आरक्षण सर्वसाधारण ओबीसी करिता राखीव असल्याने जबरदस्त जनसंपर्क व दोन वेळा उपसरपंच पदी विराजमान झाल्याने ग्रामपंचायतचा दांडगा अनुभव असणाऱ्या सुनील काळे यांच्या गळ्यात सरपंच पदाची माळ पडणार हे सर्वश्रुत होते. तर, उपसरपंच म्हणून सर्वसाधारण आरक्षण सुटले असते तर सरपंच पदाच्या शर्यतीत असणाऱ्या ज्योती श्रीकांत साळे यांच्या पदरात उपसरपंच पद देऊन आमदार शिरसाट यांनी मध्य साधत आपल्या राजकीय अनुभवाचे दर्शन दिले.

बिनविरोध सरपंच, उपसरपंच

7 ऑक्टोबर रोजी ग्रामपंचायत सदस्य सुनिल काळे यांनी सरपंच पदासाठी अर्ज सादर केला त्यावर सूचक म्हणून सुनीता राजेश साळे, तर उपसरपंच पदाचा अर्ज सादर करणाऱ्या ज्योती साळे यांच्या अर्जावर सूचक म्हणून विष्णू उगले यांची स्वाक्षरी आहे. यावेळी ग्रामपंचायत सदस्य संभाजी चौधरी यांची सुध्दा उपस्थिती होती. दुपारच्या सत्रातया दोघांच्या व्यतिरिक्त एकाही उमेदवाराने अर्ज दाखल न झाल्याने सरपंच पदी सुनील काळे यांची तर उपसरपंच म्हणून ज्योती साळे यांच्या नावाची घोषणा निवडणूक निर्णय अधिकारी नायब तहसीलदार अनिल कुलकर्णी यांनी केली। यावेळी तलाठी रघुनाथ शेळके, ग्रामपंचायतीचे प्रशासक दिपक बागुल ग्रामविकास अधिकारी हरिष अंधळे यांची उपस्थिती होती.

शिवसेना गटाची अनुपस्थिती

यावेळी शिवसेना गटाचे तीन सदस्य अनुपस्थित होते तर, एकमेव मंदा भोकरे यांनी उपस्थिती लावल्याने त्या आमदार गटात सामील होणार की काय? अशी चर्चा यावेळी चांगलीच रंगली होती.

बातम्या आणखी आहेत...