आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशिक्षणाचे भगवेकरण थांबवावे, सुशिक्षित बेरोजगारांना दरमहा १० हजार रुपये भत्ता मिळावा यासह विविध ११ ठराव मंजूर करून ११ व्या कॉ. अण्णा भाऊ साठे साहित्य संमेलनाची सांगता झाली. समारोपात विचारवंत रावसाहेब कसबे यांनी ‘भारतीय संसदीय राजकारणाची सद्य:कालीन दिशा’ या विषयावर भूमिका मांडली. सांगलीच्या जी. के. ऐनापुरे यांनी ‘भारतीय सहित्य, मराठी साहित्य, डाव्या चळवळी आणि प्रगतिशील लेखक संघ’, तर ‘अण्णा भाऊ साठे आणि वर्तमानकालीन अस्मितेचे राजकारण’ यावर डॉ. दत्ता घोलप, डॉ. प्रवीण बनसोड आणि महादेव खुडे यांनी मांडणी केली. डॉ. मुस्तजीब खान यांनीही ‘समांतर सिनेमा’वर विचार मांडले.
संमेलनात मंजूर झालेले ११ ठराव असे {अण्णा भाऊंना मरणोत्तर डी.लिट.बद्दल एमजीएम विद्यापीठाचे अभिनंदन. {अण्णा भाऊ, वामनदादा कर्डक यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देऊन गौरव करावा. {अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला घालणाऱ्या व्यवस्थेचा निषेध. {घटनात्मक संस्थांची स्वायत्तता, विश्वासार्हता अबाधित ठेवावी. {वाढत्या मूलतत्त्ववादाचा निषेध. {राज्यघटना, लोकशाहीवरील आक्रमणाचा निषेध करण्यात आला. {शिक्षणाचे भगवेकरण थांबवावे. {सर्वांना गुणवत्तापूर्ण आणि मोफत शिक्षण देण्यात यावे. {सुशिक्षित बेरोजगारांना नोकरी मिळेपर्यंत दरमहा १० हजारांचा भत्ता द्यावा. खासगी क्षेत्रातही आरक्षण लागू करावे. {जल, जंगल, जमीन या नैसर्गिक संपत्तीचे खासगीकरण थांबवूून पिळवणूक बंद करा. { फुले-शाहू-आंबेडकर-अण्णा भाऊंच्या नावाने १०० स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रे आणि ग्रंथालये सुरू करावीत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.