आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रेकॉर्डमध्ये नोंद:11 वर्षीय जयेशला 195 देशांची राष्ट्रगीते तोंडपाठ ; गिनीज बुकसाठी 6 वर्षे पडतात कमी

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

अकरावर्षीय विद्यार्थ्याला १९५ देशांची राष्ट्रगीते तोंडपाठ आहेत असे जर तुम्हाला सांगितले, तर तुम्ही विश्वास ठेवाल का..? नाही ना? पण हे वास्तव आहे. पुण्यातील द कल्याणी स्कूलमध्ये इयत्ता सहावीतील जयेश ठोलियाची ही रंजक कथा आहे. त्याला जगात कुणीही स्पर्धक नाहीये. त्यानेच स्वत:चे ७ वेळा रेकॉर्ड मोडले आहे. आशिया बुक आणि इंडिया बुक ऑफ रेकॉर्डने त्याची नोंद घेतली आहे. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डची त्याने तयारी केली. पण सहा वर्षांनी वय कमी भरते असे त्याची आई डॉ. ज्योती ठोलिया यांनी म्हटले आहे.

जयेशचा जन्म ११-११-११ या अनोख्या तारखेला झाला आहे. त्याने २०१७ दरम्यान टीव्हीवरून भारत पाकिस्तानचा क्रिकेट सामना पाहिला. नाणेफेक झाल्यानंतर सामना सुरू होण्यापूर्वी त्याने पाकिस्तानचे राष्ट्रगीत ऐकले. पाकिस्तानचे राष्ट्रगीत पर्शियन भाषेतील आहे. जयेशने प्रयत्न केला तर त्याला तोंडपाठ झाले. तत्पूर्वी त्याला फक्त भारताचे राष्ट्रगीत येत होते. त्यानंतर नेपाळ, ऑस्ट्रेलिया, बुरांडी आदी देशांचे राष्ट्रगीत पाठ करून घेतले. त्या वेळी त्याने ३० देशांचे राष्ट्रगीत पाठ करून आशिया आणि इंडिया बुकमध्ये नोंदवले.

पुढे त्याचेच रेकॉर्ड मोडण्यासाठी ५१ देश, नंतर ७५, टप्प्याटप्प्याने १००, १२०, १५० देशांचे राष्ट्रगीत तोंडपाठ केले. त्याने जगातील साऱ्याच म्हणजे तब्बल १९५ देशांचे राष्ट्रगीत पाठ करून घेतले. त्याने ३१ ऑक्टोबर २०२२ रोजी आशिया बुकमध्ये स्वत:चेच रेकॉर्ड मोडण्यासाठी टिमोर लेस्टे या देशाचे राष्ट्रगीत गायले. १९५ पैकी ७० देशांचे इंग्रजीत राष्ट्रगीत असून ते सोपे होते, असे जयेशचे मत आहे. उर्वरित १२५ देशांच्या राष्ट्रगीतांची भाषा वैविध्यपूर्ण आहे. त्यामुळे आपल्याला सर्वच देशांच्या भाषा शिक‌ण्याची इच्छा झाली आहे, असेही त्याने म्हटले आहे. त्याचे वैशिष्ट्य म्हणजे, अमेरिकेत आत्तापर्यंत झालेल्या ४६ राष्ट्राध्यक्षांची कार्यकाळासह नावेही तो लीलया सांगतो.

जगात शांतता आणि सद््भाव राहावा आपल्याला अनेक देशांचे निमंत्रण येत आहे. पहिल्यांदा मी भूतानच्या निमंत्रणावरून जाणार आहे. त्यानंतर नामिबिया, न्यू गिनी आणि नंतर सुदानला जाईन. पर्यटनासाठी मात्र दोन ते तीन देश फिरून आलो आहे. अमेरिकेत दोन वर्षांचे वास्तव्य होते. पृथ्वीवरील सर्व देश समान आहेत. त्यांच्यात सामंजस्य, शांतता, सद््भाव राहावा म्हणून काम करायची इच्छा आहे. संयुक्त राष्ट्रसंघाने दखल घ्यावी. परंतु सॉफ्टवेअर इंजिनिअर व्हावे असे जयेश वाटते आहे. वर्ल्ड साँगही त्याने पाठ केले आहे. आईने सिम्बायोसिसमधून पीएचडी केली आहे.

बातम्या आणखी आहेत...