आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

हिंगोली:17 लाखांचा गुटखा जप्त, टेम्पोच्या मागच्या बाजूस मका पिकाचे पोते तर आत 110 पोते आरजे गुटखा

हिंगोली8 महिन्यांपूर्वीलेखक: मंगेश शेवाळकर
  • कॉपी लिंक

हिंगोली ते वाशीम मार्गावर बासंबा पाटीजवळ स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गुरुवारी (ता. १) सकाळी आकरा वाजता एका टेम्पोतून आरजे कंपनीच्या गुटख्याची ११० पोते जप्त केले असून या गुटख्याची किंमत १७ लाख रुपये असल्याचे सांगण्यात आले आहे. पोलिसांनी टेम्पो व गुटखा जप्त केला असून पोलिसांनी चालकासह दोघांची चौकशी सुरु केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाशीम जिल्हयातील कारंजा येथून एका टेम्पोमध्ये गुटख्याची वाहतुक केली जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यावरून पोलिस अधिक्षक राकेश कलासागर, अप्पर पोलिस अधिक्षक यशवंत काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक जगदिश भंडारवार, उपनिरीक्षक शिवसांब घेवारे, किशोर पोटे, जमादार बालाजी बोके, संभाजी लकुळे, सुनील अंभोरे, भगवान आडे, विठ्ठल कोळेकर, आशिष उंबरकर, विलास सोनवणे, राजू ठाकूर, किशोर कातकडे, ज्ञानेश्‍वर सावळे यांच्यासह पथकाने आज सकाळ पासूनच वाशीम कडून येणाऱ्या वाहनांची तपासणी सुरु केली होती.

दरम्यान, सकाळी आकरा वाजता पोलिसांनी एक टेम्पो (एमएच-४८-जे-०९०४) थांबवून चालक शेख बबलू (रा. अर्धापुर, जि. नांदेड) याची चौकशी सुरु केली. त्याने चौकशीमध्ये टोम्पेत मका पिकाची पोते असल्याचे सांगितले. मात्र पोलिसांना संशय आल्याने त्यांनी टेम्पो थेट पोलिस अधिक्षक कार्यालयात आणून तपासणी केली. यामध्ये मका पिकाच्या पोत्यामधे गुटख्याची पोते आढळून आले. यामध्ये आरजे नावाचा ११० पोते गुटखा असल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी चालक शेख बबलू व शेख जाकेर (दोघे. रा. अर्धापूर, जि. नांदेड) यांना ताब्यात घेऊन त्यांची चाैकशी सुरु केली आहे. सदरील गुटख्याची पोते कारंजा येथून नांदेडकडे नेले जात असल्याचे प्राथमिक चौकशीत स्पष्ट झाले आहे.

ठराविक अंतरानंतर होत होती चालकाची बदली

सदर गुटख्याचा टेम्पो अमरावती येथून कारंजा येथे बुधवारी (ता. ३०) रात्री आणून सोडण्यात आला त्यानंतर तेथून टेम्पो नांदेडकडे नेण्याची जबाबदारी शेख बबलु याच्यावर सोपविण्यात आल्याचे प्राथमिक चौकशीत स्पष्ट होत आहे. त्यानुसार त्याने सकाळी टेम्पो ताब्यात घेऊन नांदेडकडे निघाल्याचेही स्पष्ट होत आहे. त्यामुळे आता पोलिसांनी विदर्भातील काही जणांची चौकशी करण्याची तयारी चालवली आहे.

बातम्या आणखी आहेत...