आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एक लाखाचा तुळशी विवाह:111 दिव्यांची आरास ; जगन्नाथपुरीचा लक्षवेधी देखावा

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

‘आली लग्नघटी समीप नवरा घेऊनि यावा घरा । वाजंत्री बहु गलबला न करणे, लक्ष्मीपते मंगलम् ।।’ सनईचे मंगल स्वर, वऱ्हाडी मंडळींची लगबग सायंकाळी बन्सीलालनगरात सुरू होती. वरपक्षाची वरात वाजतगाजत येताच आंतरपाट धरला गेला अन् मंत्रोच्चारात तुळशी-दामोदर विवाह लागला. अक्षता टाकताच सर्वांनी ताल धरला. जगन्नाथपुरीचा देखावा, १११ दिव्यांचा दीपोत्सव लक्षवेधी ठरला.

माहेश्वरी महिला संघटनेच्या वतीने १ लाख रुपये खर्चून झालेल्या विवाहात २० जोडप्यांचा सहभाग होता. श्रीकांत मुंदडा यांच्या निवासस्थाहून सायंकाळी वरात निघाली. यामध्ये रथात नवविवाहित दांपत्य सी.ए. शुभम आणि अक्षता राठी बसले होते. भक्तिगीतांच्या गाण्यावर वरात काढताना महिलांनी फुगडी खेळण्याचा आनंद घेतला. या वेळी जिल्हा माहेश्वरी महिला संघटनेच्या अध्यक्षा स्मिता मुंदडा, प्रकल्प प्रमुख मनीषा बलदवा, किशोरलाल धूत, डॉ. विष्णुदास बजाज उपस्थित होते.

लक्षवेधी ठरला जगन्नाथपुरीचा आकर्षक देखावा
वरात वाजतगाजत गिरिजामाता मंदिरापर्यंत पोहोचली. या वेळी २१ महिलांनी फुलांनी सजवलेले ताट तर काहींनी मोरपिसांनी सजवलेल्या ताटात कृष्णमूर्ती बसवली होती. गुरुजी रवी पुजारी यांनी विवाह लावला. ५६ भोगसुद्धा लावण्यात आले होते. साधना मुंदडा यांनी कृष्णाची प्रतिकृती रांगोळीतून रेखाटली होती. प्रीती मुंदडा यांनी तुळशीला सजवले होते. यानंतर दीडशे ते दोनशे जणांनी जेवणाचा आस्वाद घेतला.

बातम्या आणखी आहेत...