आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबाद:दारूची कारवाई करायला गेले अन् मोपेडच्या डिकीत 118 तोळे सोने आढळले

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

अवैध दारू विक्रीचा तपास करत असताना संशयावरून दुचाकी थांबवली असता डिकीत तब्बल ११८ तोळे साेने आढळल्याची घटना गुरुवारी रात्री समोर आली. अवैध दारूऐवजी किलोभर सोने पाहून क्षणभर पोलिसही अवाक् झाले. पोलिसांनी हिशेब विचारल्यानंतर पावत्या न सापडल्याने रात्रभर चौकशी करून शुक्रवारी चिकलठाणा पोलिसांनी प्रकरण जीएसटी विभागाकडे सुपूर्द केले.

चिकलठाणा पोलिस ठाण्याचे सहायक निरीक्षक एस. एस. रोडगे, अंमलदार रवींद्र साळवे पथकासह गस्तीवर होते. अवैध दारू विक्रीची कारवाई करत असताना दुचाकीतून होणाऱ्या दारू तस्करीची ते तपासणी करत होते. दहा वाजता एक मोपेड दुचाकी थांबवली. त्यांनी विचारपूस करत असताना सीट वर करण्यास सांगताच डिकीत १ किलो १८० ग्रॅम ६७० मिलिग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने दिसले. चौकशीत तनीष जितेश जैन (२२) व कल्याणसिंग हीरसिंग (३८) हे मुंबईतील सोन्याच्या दागिन्यांचे विक्रेते असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांच्याकडे खरेदी पावती नसल्याने पोलिसांनी कसून चौकशी सुरू केली. परंतु ट्रॅव्हल व्हाऊचर आढळून आले. शहरात पाच-सहा व्यापाऱ्यांना सोने दाखवून ते शेंद्र्याकडे गेले होेते. तेथून ते शहरात परतत होते. करचुकवेगरीच्या माध्यमातून हे सोने खरेदी झाले आहे का, याच्या तपासासाठी चिकलठाणा पोलिसांनी शुक्रवारी जीएसटी कार्यालयाच्या अधिकाऱ्यांकडे प्रकरण वर्ग केले. जीएसटी अधिकाऱ्यांनी संबंधित व्यापाऱ्याला पावत्या व कागदपत्रे सादर करण्यासाठी दोन दिवसांचा वेळ दिला आहे.

बातम्या आणखी आहेत...