आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिंदुत्ववादी संघटनांनी सुरू केले विशेष अभियान:औरंगाबादच्या समर्थनात 11,802 अर्ज; छत्रपती संभाजीनगरसाठी केवळ पस्तीस

छत्रपती संभाजीनगर9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद शहराचे नामांतर छत्रपती संभाजीनगर केल्यानंतर विभागीय आयुक्त कार्यालयात हरकती आणि आक्षेप स्वीकारण्यात येत आहेत. १३ मार्चपर्यंत आैरंगाबादच्या समर्थनार्थ ११,८०२ अर्ज तर छत्रपती संभाजीनगरचे समर्थन करणारे केवळ ३५ अर्ज आले आहेत. २६ फेब्रुवारीपासून नामांतराची अधिसूचना प्रसिद्ध झाल्यानंतर हरकती आणि आक्षेप मागवण्यात येत आहेत. त्यामुळे आता हिंदुत्ववादी संघटनांनी माेठ्या संख्येने अर्ज भरून ते दाखल करण्यासाठी शहरासह जिल्हाभरात अभियान सुरू केले आहे.

औरंगाबादचे नामांतर झाल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर संघर्ष समितीच्या वतीने आंदोलन करण्यात येत आहे. त्यामुळे येथे नामांतराच्या विरोधात फॉर्म भरून ते विभागीय आयुक्त कार्यालयात दाखल केले जात आहेत. त्या तुलनेने संभाजीनगर नावाच्या समर्थनार्थ अर्ज येत नसल्याचे चित्र आहे.

दहा हजार पोस्टकार्ड पाठवणार : छत्रपती संभाजीनगरच्या समर्थनार्थ उद्धव गटाकडून शासनाला दहा हजार पोस्टकार्ड पाठवले जाणार आहेत. सोमवारपासून गुलमंडी येथे नागरिकांकडून हे पोस्टकार्ड भरून घेण्यास सुरुवात झाल्याची माहिती जिल्हाप्रमुख किशनचंद तनवाणी यांनी दिली. गुलमंडीवरील प्रत्येक दुकानामध्ये जाऊन शिवसैनिकांनी छत्रपती संभाजीनगरचा फलक लावला. त्यासोबत समर्थनार्थ विभागीय आयुक्तांच्या नावे दहा हजार पोस्टकार्ड पाठवण्यास सुरुवात करण्यात आली. या वेळी माजी महापौर नंदकुमार घोडेले, उपजिल्हाप्रमुख बंडू ओक, शहरप्रमुख विश्वनाथ स्वामी आदींची उपस्थिती होती.

गावागावात सुरू झाले अर्ज भरण्याचे अभियान : सकल हिंदू जनजागरण समितीच्या वतीने शहराच्या चौकाचौकात व ग्रामीण भागातील गावागावात छत्रपती संभाजीनगरच्या समर्थनार्थ टेबल लावून अर्ज भरण्यास सुरुवात केली आहे. सर्व अर्ज एकत्र करून २५ मार्च रोजी जिल्हा प्रशासनाकडे सादर केले जातील, अशी माहिती माजी उपमहापौर राजेंद्र जंजाळ यांनी दिली. सोमवारी सायंकाळी सिडको एन-१ येथील काळा गणपती परिसरात घरोघरी जाऊन दोन हजार अर्ज भरून घेण्यात आले. संस्थान गणपती परिसरातही अर्ज भरण्यासाठी व्यवस्था करण्यात आली आहे. येथे दोन हजारांवर नागरिकांनी अर्ज भरून दिले.

खा. इम्तियाज जलील उपमुख्यमंत्री फडणवीसांचे मित्र शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी १९८८ साली सर्वप्रथम औरंगाबाद शहराचे संभाजीनगर नामकरण केले. ३५ वर्षांपासून हे शहर संभाजीनगर नावाने ओळखले जाते. मात्र, एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी विराेध करत आंदोलन सुरू केले आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या या मित्राची समजूत काढावी, असे तनवाणी म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...