आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामहाराष्ट्रातील १० जिल्ह्यांत ११९५ पोलिसांची भरती केली जाणार आहे. त्यात रेल्वे पोलिस, एसआरपीएफ, ड्राईव्हर आणि पोलिस शिपायांचा समावेश आहे. नाशिक ग्रामीण पोलिस मुख्यालयात सर्वाधिक ४६९ जागा आहेत. त्याखालोखाल नागपूरच्या काटोलच्या राज्य राखीव पोलिस दलात २४३ जागा आहेत. औरंगाबाद ग्रामीणचे ३९ तर शहर पोलिस आयुक्तालयात १५ ड्रायव्हरची भरती केली जाणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यभर पोलिस भरती केली जाणार असल्याची नुकतीच घोषणा केली होती. त्यानंतर आता १० जिल्ह्यांतील शहरी, ग्रामीण, एसआरपीएफ आणि रेल्वे पोलिसांच्या भरती प्रक्रियेला वेग आला आहे. नाशिकच्या ग्रामीण पोलिस अधीक्षक कार्यालयात ४६९ पोलिस शिपायांच्या जागा भरण्यात येणार आहेत. नागपुर रेल्वे पोलिसांच्या २८ जागा असून त्यासाठीही ३० नोव्हेंबरपर्यंत अर्ज करता येणार आहे.
नागपूर जिल्ह्यातील काटोलच्या एसआरपीएफमध्ये २४३ जागा आहेत. ही भरती सशस्त्र पोलिसांची असून त्यासाठी ३० नोव्हेंबरपर्यंत अर्ज करता येणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पोलिस अधीक्षक कार्यालयासाठी १२१ जागा आहेत. लातूर जिल्ह्यात २९, वाशिम-१४, अमरावती-४१, हिंगोली-२१ असे पदे भरली जाणार आहेत. सातारा जिल्ह्यानेही पोलिस भरतीची जाहिरात प्रसिद्ध केली आहे. त्यात १४५ जागांची भरतीचे नियोजन आहे. त्यासाठी ३० नोव्हेंबरपर्यंत ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. गोंदिया जिल्ह्यातील बिरसी कँप येथील एसआरपीएफमध्ये ४० पोलिस शिपायांच्या जागा असून ३० तारखेपर्यंत अर्ज करता येईल.
चालकांच्याही २९ जागा भरणार, जीप चालवण्यासाठी २५ गुण औरंगाबाद शहर पोलिस आयुक्तालयात १५ पोलिस वाहन चालकांच्या जागा आहेत. त्याशिवाय वाशिम जिल्ह्यातही १४ वाहन चालकांंच्या जागा आहेत. दोन्ही ठिकाणी ३० इच्छुकांना ३० नोव्हेंबरपर्यंत अर्ज करता येणार आहे. शंभर पैकी पन्नास टक्के गुण शारीरीक क्षमता चाचणीला आहेत. त्यात उमेदवारांना ५० टक्के गुण घ्यावे लागेल. एलएमव्ही वाहन चालवणे, जीप चालवण्यासाठी प्रत्येकी २५ गुण असतील. त्यात ४० टक्के गुण संपादन करणे अनिवार्य असेल. www.mahapolice.com आणि policerecruitment-2022.mahait.org या संकेतस्थळांना भेट देऊन सविस्तर जाहिरात पाहता येईल.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.