आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दिव्य मराठी विशेष:औरंगाबाद जिल्ह्यात 2 लाख 30 हजार शेतकऱ्यांना 1199 कोटींचे कृषी कर्जवाटप; तरी उद्दिष्ट अपूर्णच

औरंगाबाद7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • परभणी जिल्ह्यात 45 टक्के तर नांदेड, हिंगोलीत केवळ 40 टक्के वाटप

मराठवाड्यात कृषी कर्ज वाटपाचे उद्दिष्ट पूर्ण होत नसताना देखील औरंगाबाद जिल्ह्याने यंदा खरिपाचे कृषी कर्जवाटपाचे उद्दिष्ट पूर्ण केले आहे. अाैरंगाबादेत २ लाख ३० हजार ४३३ शेतकऱ्यांना १,१९९ कोटी ९६ लाखांचे कर्जवाटप करण्यात आले आहे. त्यामुळे कर्जवाटपात अाैरंगाबाद जिल्हा मराठवाड्यात पहिल्या क्रमांकावर असल्याची माहिती जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली. हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यात केवळ ४०, तर परभणीत ४५ टक्के कर्जवाटप झाले आहे. कोरोनाच्या काळात बँक अधिकाऱ्यांनी कर्जवाटपाचे काम सुरू ठेवले होते. त्याचा चांगला परिणाम औरंगाबाद जिल्ह्यात पाहायला मिळत आहे. कृषी कर्ज वाटपाचे शंभर टक्के उद्दिष्ट पूर्ण झाले असून औरंगाबाद जिल्हा राज्यात सहाव्या क्रमांकावर आहे.

जिल्हा मध्यवर्ती बँकेने ४२८ कोटींचे केले कर्ज वाटप :

औरंगाबाद जिल्ह्यात जिल्हा बँकेला ४११ कोटींचे उद्दिष्ट होते. बँकेने ४२८ कोटींचे शेतकऱ्यांना कर्ज दिले आहे. त्यामुळे १०४ टक्के कर्जवाटप करण्यात आले आहे. महाराष्ट्र ग्रामीण बँकेला ११३ कोटींचे उद्दिष्ट असताना १८८ कोटींचे कर्जवाटप केले असून १६६ टक्के कर्जवाटप केले आहे. बँक ऑफ इंडियाने २९ कोटी ८० लाख (१४७ टक्के), बँक ऑफ बडोदा ५२ कोटी ४१ लाख (११७ टक्के), एसबीआयला २१८ कोटींचे उद्दिष्ट असताना केवळ १६६ कोटी वाटप केले असून हे प्रमाण ७६ टक्के आहे. तर, सेंट्रल बँक ऑफ इंडियाला ३६ कोटींचे उद्दिष्ट असताना ३१ कोटी वाटप केले असून हे प्रमाण ८६ टक्के आहे.

लातूर विभागात ५४ टक्के कर्जवाटप

औरंगाबाद विभागात औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली या चार जिल्ह्यांत परभणीत १,५६७ कोटींचे उद्दिष्ट असताना ७१० कोटींचे वाटप झाले असून हे प्रमाण ४५ टक्के आहे. जालना जिल्ह्यात १,११५ कोटींचे उद्दिष्ट हाेते. त्यापैकी ८२९ कोटींचे वाटप झाले असून हे प्रमाण ७४.४० टक्के आहे. हिंगोलीत १,१६८ कोटींचे उद्दिष्ट असताना ४७१ कोटींचे वाटप झाले असून हे प्रमाण केवळ ४० टक्के आहे. लातूर विभागात लातूरमध्ये १,१९३ कोटी (५२ टक्के), उस्मानाबाद ८५० कोटी (५३ टक्के), बीड ८५१ (८९ टक्के), नांदेड ८३१ (४०.९३ टक्के) कर्जवाटप झाले आहे. लातूर विभागात ५४ टक्के कर्जवाटप झाले आहे.

बातम्या आणखी आहेत...