आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराधर्मादाय आयुक्त कार्यालयाच्या पुढाकाराने आयोजित सामूहिक विवाह सोहळ्यात १२ बौद्ध, १ मुस्लिम तर ४२ हिंदू विवाह झाले. १० धर्मादाय संस्थांनी हा उपक्रम राबवला. यासाठी २० लाखांचा निधी संकलित झाला होता. वेरूळच्या शांतीगिरी महाराज ट्रस्टमध्ये हा सोहळा झाला. धर्मादाय आयुक्त कार्यालयाच्या वतीने हे आयोजन मागील ३ वर्षांपासून केले जाते. ग्रामीण भागात शेतकरी आत्महत्या आणि भटक्या विमुक्तांना केंद्रस्थानी ठेवून हा उपक्रम हाती घेण्यात आला. कार्यालयांतर्गत येणाऱ्या विविध ट्रस्टना आवाहन करून निधी उभारण्यात आला. २० लाखांचा निधी संकलित झाला. ५५ जोडप्यांनी नोंदणी केली होती. आलेल्या अर्जांची छाननी करून योग्य असलेल्या जोडप्यांचा विवाह लावण्यात आला.
संसारोपयोगी वस्तूही दिल्या २ ग्रॅमचे मणिमंगळसूत्र, ५ ग्रॅमची चांदीची वस्तू, वर-वधूंना कपडे आणि विवाह लावून देण्यासाठीच्या संपूर्ण सामग्रीचा खर्च यामध्ये करण्यात आला. शांतीगिरी मठाच्या वतीने वर-वधूंसह आलेल्या ४० जणांच्या जेवणाची सोय करण्यात आली. विवाहानंतर सर्वांना विवाह प्रमाणपत्रही देण्यात आले. गेल्या वर्षी १२५ विवाह या सोहळ्यात लावण्यात आले होते.
लोकांचे धन लोकांसाठी अर्पण मंदिरांत लोक दान करतात. हे धन लाेकांच्याच भल्यासाठी वापरले जावे या प्रेरणेने आम्ही या विवाह सोहळ्यांचे नियोजन केले होते. मागील ३ वर्षांंपासून सर्व मोठी संस्थाने यामध्ये सहभागी होतात. नवीन आयुष्याची सुरुवात करण्यासाठी दिलेले हे योगदान आहे. दयाराम बसैये, अध्यक्ष, सामुदायिक विवाह समिती
समाजाला याची गरज होती कर्जबाजारी कुटुंबातील मुलांचे विवाह होणे अवघड होते. यातून समस्या वाढत जातात. त्यामुळे आम्ही हा पुढाकार घेतला. सर्वच संस्थांनी याला भरघोस प्रतिसाद दिला. त्यामुळे सोहळा झाला. सुरेंद्र बियाणी, सहआयुक्त, धर्मादाय कार्यालय
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.