आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बनवतात रावण:उत्तर भारतातील 12 मुस्लिम कारागीर 20 वर्षांपासून शहरात बनवतात रावण

रोशनी शिंपी | औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

एन-७ येथील दसरा उत्सवातील रावण दहनाची तयारी पूर्णत्वाकडे आली आहे. उत्तर प्रेदशातील बुलंदशहरातील १२ मुस्लिम कारागीर २० वर्षांपासून औरंगाबादेत रावणाचा पुतळा बनवतात. यंदा बनवलेल्या ६० फुटी रावणाचे तोंड तिन्ही दिशांना फिरणारे असेल. हेच यंदाच्या उत्सवात प्रमुख आकर्षण ठरेल. शहरात एन-७, वाळूज आणि टीव्ही सेंटर या तीन भागांमध्ये रावण दहन सोहळा होईल.

उत्तर भारतीय संघातर्फे ३८ वर्षांपासून रावण दहन करून दसरा महोत्सव साजरा केला जातो. संघाचे ओमी पटेल म्हणाले, पूर्वी पुतळा आम्ही तयार करायचो. पण, तो पुतळा आकर्षक नसायचा. म्हणून मागील २० वर्षांपासून आम्ही चाँद खान यांच्याकडून खास कारागिरांकडून पुतळा बनवून घेतो.

चाँदभाई म्हणाले, ६ सप्टेंबरपासून आम्ही औरंगाबादेत रावणाच्या पुतळानिर्मितीचे काम सुरू केले आहे. एन-७ मैदानासाठी ६० फुटांचा, टीव्ही सेंटर मैदानासाठी ३३ फुटांचा, तर वाळूजसाठी ४५ फुटांचा पुतळा बनवत आहोत. २००२ मध्ये पहिल्यांदा २० हजारांत रावण बनवला. कोरोनापूर्वी ७० हजारांत, यंदा मात्र २ लाखांचा आहे. कारण बांबू, बल्ली, सुतळी, पेपर, गम, कापड, कारागीरांचा खर्च वाढला आहे.रावणाचे धड, हात तसेच ३ मुखे बनून तयार आहेत. ७ मुखे बनवण्याचे काम सुरू आहे. यंदा पावसामुळे आमच्या कामात बराच अडथळा आला.

रावण दहनासाठी गर्दी
रावण दहन पाहणे प्रत्येकासाठी अभिमानचा क्षण असतो. ३८ वर्षांपासून यासाठी प्रचंड गर्दी होते. यंदाचा उत्साहही अधिक असेल. ६० फुटी पुतळा जेव्हा सर्वत्र तोंड फिरवेल तेव्हाचा उत्साह पाहण्यासारखा ठरेल.ओमी पटेल, उत्तर भारत संघप्रमुख.

गाव कारागिरांचं
बुलंदशहर जिल्ह्यातील आमचे संपूर्ण गावच कारागिरांचे आहे. वर्षभर आम्ही मजुरी करतो. पण हा एक महिना गावातील सर्वच पुरुष देशातील विविध शहरात रावण पुतळा बनवण्याच्या कामासाठी जातात. ५ वर्षांपासून माझी मुले सद्दाम, कासिमही माझ्यासोबत येतात. चाँद खान, कारागीर

बातम्या आणखी आहेत...