आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराउद्धव ठाकरे गटाकडे आता ना पक्षाचे नाव राहिले, ना चिन्ह, तरीदेखील भारतीय जनता पक्षाच्या शहरातील १२ पदाधिकाऱ्यांनी गुरुवारी (२ मार्च) रोजी मुंबईत मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवबंधन बांधून घेतले. सध्याचे जिल्हाप्रमुख किशनचंद तनवाणी यांनी २०१४ मध्ये भाजपमध्ये प्रवेश केल्यावर त्यांच्यासोबत गेलेले सर्व पदाधिकारी पुन्हा उद्धव गटात आले आहेत.
मनपा निवडणूक जवळ येत आहे तसे तनवाणी यांनी पुन्हा त्यांच्या गटाची जमवाजमव करण्यास सुरुवात केली आहे. पक्षाबरोबरच त्यांचा स्वत:चा गट ते कायम सक्रिय ठेवतात. त्याच गटातील या नेत्यांना भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर पदे मिळाली होती. काही तर लोकप्रतिनिधी झाले होते. तनवाणी पुन्हा शिवसेनेत प्रवेश करून वर्ष उलटून गेले. मात्र, हे पदाधिकारी परतले नव्हते. सध्या उद्धव गटाला ना पक्षाचे नाव आहे ना चिन्ह, तरीदेखील ही मंडळी परतली आहे.
भाजपच्या माजी नगरसेविका बबिता चावरिया, युवा मोर्चाचे सचिन झवेरी, मंडळ अध्यक्ष सुधीर नाईक, अमित घनघाव, योगेश अष्टेकर, अजय चावरिया, पंचायत समिती सदस्य लक्ष्मण लांडे, भाजप जिल्हा उपाध्यक्ष अरविंद धीवर, माजी सरपंच बाबासाहेब कारले, बजरंग पाटील, मोहसीन खान आणि उत्तम अंभोरे यांनी गुरुवारी उद्धव गटात प्रवेश केला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.