आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे पदवी प्रमाणपत्र बनावट तयार करू नये म्हणून १२ प्रकारचे सेक्युरिटी फीचर्स निर्माण केले आहेत. पूर्वी ७ होते आता त्यात ५ फीचर्सची भर टाकली आहे. १९ नोव्हेंबरच्या दीक्षांत समारंभापासून हे पदवी प्रमाणपत्र विद्यार्थ्यांना दिले जाईल.
नागपूरच्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठात पंधरा ते वीस वर्षांपूर्वी पदवी घोटाळा झाला होता. या घोटाळ्याला ‘कोहचाडे’ प्रकरण असे म्हटले गेले होते. देशभर कोहचाडे घोटाळ्याची चर्चा झाली होती. डॉ. आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रमोद येवले आणि परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. गणेश मंझा यांनी मात्र असले प्रकार येथे कधीच होऊ नये म्हणून आधीच्या सात फीचर्समध्ये आणखी पाच वाढवले आहेत. कधीही कुणीही डुप्लिकेशन करणार नाही, असा विश्वास कुलगुरूंनी व्यक्त केला आहे. पदवी प्रमाणपत्राच्या जागोजागी हे फीचर्स छुप्या पद्धतीने पेरण्यात आले आहेत.
पदवी प्रमाणपत्रात सुरक्षेचे आधीचे सात फीचर्स १. गोल्ड फाइल्ड लोगो : विद्यापीठ नावाखाली सोनेरी रूपात विद्यापीठाचा लोगो आहे. हा लोगो इतर कुठेही करता येणार नाही. २. क्यूआर कोड : यात संबंधित विद्यार्थ्यांचे सर्व शैक्षणिक ट्रॅक रेकॉर्ड आहे. ३. बार कोड : बार कोडमध्येदेखील विद्यार्थ्यांची शैक्षणिक माहिती आहे. दोन्ही कोड स्कॅन केले तर त्याचे रेकॉर्ड आपल्याला वाचता येतील. ४. हाय रेझाल्युशन बॉर्डर : बॉर्डरवर अतिशय सूक्ष्म अल्फाबेट आहेत. ५. मायक्रो टेक्स्ट बॉर्डर : यातही विशिष्ट प्रकारच्या अल्फाबेट्सची छपाई आहे. दोन्ही बॉर्डरमधील अल्फाबेट वेगवेगळ्या विद्यार्थ्यांचे वेगवेगळे असणार आहे. ६. प्रिंटेड वॉटर मार्क : क्रिप्टो प्रकारातील हा प्रिंटेड वॉटर मार्क असेल, इतर कुठल्याही प्रेसमध्ये छापता येणार नाही. ७. ड्यूल हिडन इमेज : कुलगुरूंच्या सहीच्या वरील भागात एक काळी पट्टी आहे. त्याखाली विद्यापीठाचे नाव प्रसिद्ध केले असून ते डोळ्यांनी दिसत नाही.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.