आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जनजागृती मोहीम:पाच शाळांतील 12 ते 17 वर्षे वयोगटातील विद्यार्थ्यांच्या लठ्ठपणाची करणार तपासणी

छत्रपती संभाजीनगर20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

लठ्ठपणा या छुप्या आजाराविषयी जनजागृती करण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागातर्फे येत्या ४ मार्चपासून राज्यव्यापी अभियान राबवण्यात येणार आहे. या उपक्रमाच्या पहिल्या टप्प्यात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पाच शाळांमधील १२ ते १७ वर्षे वयोगटांतील मुला-मुलींची आरोग्य तपासणी केली जाणार आहे.वजन आणि उंचीनुसार लठ्ठपणा (बॉडी मास इंडेक्स, बीएमआय) तपासणी करून विद्यार्थ्यांचे जोखमीनुसार वर्गीकरण केले जाईल. त्याचबरोबर विद्यार्थ्यांना आरोग्य कार्ड दिले जाणार आहे. यासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातर्फे पाच आरोग्य पथके नेमण्यात आली आहेत. प्रत्येक शाळेत तपासणी व वरिष्ठ वैद्यकीय अध्यापकांकडून प्रबोधन, जनजागृती केली जाणार आहे.

मुलांमध्ये वाढतोय लठ्ठपणा : लठ्ठपणा, स्थूलपणा हे कमी वयात आढळून येणे ही एक गंभीर बाब आहे. या आजारामुळे मुले व मुलींना भविष्यात मधुमेह, उच्चरक्तदाब, रक्तातील चरबीचे प्रमाण वाढणे, मासिक आजार आदी होण्याची होण्याची भीती असते. या प्रकारचे आजार नव्या पिढीत होऊ नये किंवा असे आजार असतील तर त्यांचा उपचाराने प्रतिबंध कसा करावे, या विषयाचा उपक्रम राबवला जाणार आहे. या मोहिमेत शाळा व जनतेने सक्रिय सहभाग नोंदवा, असे आवाहन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. संजय राठोड यांनी केले आहे.

शहरातील या शाळांमध्ये होणार तपासणी मिलिंद मल्टिपर्पज हायस्कूल, सावित्रीबाई फुले हायस्कूल, संत विश्रामबाबा विद्यालय, बाल ज्ञानमंदिर खडकेश्वर, पोदार इंटरनॅशनल स्कूल आयसीएससी गारखेडा शाळांमधील सातवी ते नववी या वर्गांतील विद्यार्थ्यांची तपासणी करण्यात येणार आहे.

बातम्या आणखी आहेत...