आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लेखी आश्वासन:12 गावांच्या आंदोलनाने रस्ता दुरुस्तीचे आश्वासन

कन्नडएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील औराळा-जेहूर या ७ किलोमीटर रस्त्याची मागील ४० वर्षांपासून शासनाकडून डागडुजीही न झाल्याने जेहूर, आडगाल, तांदुळवाडी आदी १२ गावांतील गावांतील हजारो नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे जेहूर एकता गावकरी संघटनेतर्फे कन्नड तहसील कार्यालयासमोर मंगळवारी उपोषण सुरू केले होते.

सायंकाळी संबंधित अधिकाऱ्यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन ६ महिन्यांत रस्त्याचे काम पूर्ण करणार असल्याचे लेखी आश्वासन दिले. यानंतर उपोषणकर्त्यांनी आंदोलन मागे घेतले. या रस्त्याबाबत औरंगाबाद बांधकाम विभागाला एप्रिल २०२२ पहिले पत्र दिले होते. त्यावर त्यांनी टोलवाटोलवी केल्याने ग्रामस्थ संतापले होते.

बातम्या आणखी आहेत...