आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गीता कार्यशाळा:इस्कॉन की गीता कार्यशाळेत 120 विविध समाजबांधवांनी घेतला सहभाग

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

लक्ष्य निश्चित करणे, क्षमता ओळखून आंतरिक शक्ती वाढवणे, नातेसंबंधांना बळकटी देणे यासह अहंकाराला हाताळण्याची कला आयुष्याला समृद्ध करते. पदवी मिळवणे, घर बांधणे यालाच आपण यश समजतो. पण, खरे यश यापलीकडे आहे. जन्माष्टमीचा उद्देश तेव्हाच सफल होईल, जेव्हा गीता आपल्या जीवनात उतरेल, असा उपदेश सुबुद्धीराय दास (डॉ. संदीप लोखंडे) यांनी दिला. अदालत रोड येथील इस्कॉन मधुबनमध्ये रविवारी गीता कार्यशाळा झाली. यात १२० जणांनी सहभाग नोंदवला. विशेष म्हणजे बौद्ध भिक्खू आणि मुस्लिम बांधवांनीही गीतासार जाणून घेण्याचा प्रयत्न केला.

सुबुद्धीराय दास म्हणाले, गीता प्रत्येकाच्या जीवनाचा कळत नकळत भाग असते. जाणीवपूर्वक गीता जीवनात उतरवली तर आपलेच नव्हे, इतरांचे जीवनही उजळून निघेल. आयुष्यात लक्ष्य निश्चित करणे गरजेचे आहे. क्षमता ओळखून आंतरिक शक्ती वाढवली पाहिजे. नातेसंबंधांना बळकटी दिली पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.

या गोष्टी करतील नाते बळकट लक्ष्य निश्चित करणे, क्षमता ओळखून आंतरिक शक्ती वाढवणे, नातेसंबंधांना बळकटी देणे यासह अहंकाराला हाताळण्याची कला आयुष्याला समृद्ध करते. पदवी मिळवणे, घर बांधणे यालाच आपण यश समजतो. पण, खरे यश यापलीकडे आहे. जन्माष्टमीचा उद्देश तेव्हाच सफल होईल, जेव्हा गीता आपल्या जीवनात उतरेल, असा उपदेश सुबुद्धीराय दास (डॉ. संदीप लोखंडे) यांनी दिला. अदालत रोड येथील इस्कॉन मधुबनमध्ये रविवारी गीता कार्यशाळा झाली. यात १२० जणांनी सहभाग नोंदवला. विशेष म्हणजे बौद्ध भिक्खू आणि मुस्लिम बांधवांनीही गीतासार जाणून घेण्याचा प्रयत्न केला

सुबुद्धीराय दास म्हणाले, गीता प्रत्येकाच्या जीवनाचा कळत नकळत भाग असते. जाणीवपूर्वक गीता जीवनात उतरवली तर आपलेच नव्हे, इतरांचे जीवनही उजळून निघेल. आयुष्यात लक्ष्य निश्चित करणे गरजेचे आहे. क्षमता ओळखून आंतरिक शक्ती वाढवली पाहिजे. नातेसंबंधांना बळकटी दिली पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...