आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

हिंगोली:सहा लाख रुपये किंमतीचे 1.20 क्विंटल चंदन जप्त, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई, 6 जणांवर कुरुंदा पोलिसांत गुन्हा दाखल

हिंगोली7 महिन्यांपूर्वीलेखक: मंगेश शेवाळकर
  • कॉपी लिंक

औंढा नागनाथ तालुक्यातील उमरा शिवारातील एका शेतात चंदनाची झाडे तोडून त्याचा गाभा साठवून ठेवल्याची माहिती मिळाल्यावरून स्थानिक गुन्हे शाखेने छापा टाकून ६ लाख रुपये किंमतीचेे १.२० क्विंटल चंदन जप्त केले आहे. या प्रकरणी सहा जणांवर मंगळवारी (ता. २२) कुरुंदा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, औंढा नागनाथ तालुक्यातील उमरा शिवारात सुदाम किशन बोंगाणे यांच्या शेतातील आखाड्यावर चंदनाची झाडे तोडून त्याचा गाभा विक्रीसाठी ठेवण्यात आल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती. त्यावरून पोलिस अधीक्षक योगेशकुमार, अप्पर पोलिस अधिक्षक यशवंत काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक जगदीश भंडारवार, उपनिरीक्षक किशोर पोटे, जमादार बालाजी बोके, संभाजी लकुळे, भगवान आडे, सुनील अंभोरे, राजूसिंह ठाकूर, शंकर ठोंबरे, किशोर सावंत यांच्या पथकाने सोमवारी (ता. २१) रात्री सुदाम बोंगाणे यांच्या शेतातील आखाड्यावर छापा टाकला. यामध्ये आखाड्यावर १.२० क्विंटल वजनाचा चंदनाचा गाभा आढळून आला आहे. या चंदनाची किंमत ६ लाख रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. सदरील झाडे सुदाम बोंगाणे, शेख अजीज शेख इस्माईल (रा. कुरुंदा) व इतर चौघांनी मिळून तोडल्याचे पोलिस चौकशीत स्पष्ट झाले आहे. पोलिसांनी चंदनाचा गाभा जप्त केला आआहे. या प्रकरणी सुदाम बोंगाणे, शेख अजीज यांच्यासह सहा जणांवर कुरुंदा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक सुनील गोपीनवार पुढील तपास करीत आहेत.

बातम्या आणखी आहेत...