आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबाद कोरोना:जिल्ह्यात आज 102 कोरोनाबधित रुग्णांची वाढ, बळींचा आकडा 179, एकूण रुग्णसंख्या 3340

औरंगाबाद2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • जालन्यात 29 नवे रुग्ण, लातुरात दोघांचा मृत्यू

जिल्ह्यात शनिवारी सकाळी  102  कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली आहे.त्यामुळे एकूण कोरोनाबाधितांची संख्या  3340 झाली आहे. यापैकी 1781 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर 179 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने आता 1380  रुग्णांवर उपचार सुरू असल्याचे प्रशासनाने कळविले आहे.

जिल्ह्यात आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे : नवजीवन कॉलनी (1), गरम पाणी (1), पडेगाव (1), जाधववाडी (2), राजाबाजार (1), एन नऊ हडको (1), ठाकरे नगर (1), बजाज नगर (1), एन सहा (1), शिवाजी नगर (1), नागेश्वरवाडी (3), शिवशंकर कॉलनी (2), गजानन नगर (2), छत्रपती नगर (1), दर्गा रोड (1), एकता नगर, हर्सुल (1), हनुमान नगर (1), सुरेवाडी (3), टीव्ही सेंटर (1), एन आठ सिडको (1), श्रद्धा कॉलनी (4), एन सहा, सिंहगड कॉलनी (1), आयोध्या नगर (1), बायजीपुरा (3), कोतवालपुरा (1), नारळीबाग (1), अंबिका नगर, मुकुंदवाडी (4), गल्ली नंबर दोन पुंडलिक नगर (1), समता नगर(1),  सिंधी कॉलनी (1),  बजाज नगर (1), जुना मोंढा, भवानी नगर (1), जयसिंगपुरा (2), , सिडको एन अकरा (1),  नेहरू नगर, कटकट गेट (1), न्यू हनुमान नगर (1), विजय नगर, नक्षत्रवाडी (1), भाग्य नगर (4), शिवाजी नगर (1), पदमपुरा (1), उत्तम नगर (2), खोकडपुरा (2), टिळक नगर (1), पिसादेवी (1), बीड बायपास (2), सखी नगर (3), जिल्हा परिषद परिसर (1), सारा गौरव बजाज नगर (3), सिद्धी विनायक मंदिराजवळ बजाज नगर (6), पंचमुखी हनुमान मंदिराजवळ बजाज नगर (4),  जय भवानी चौक, बजाज नगर (1), चिंचवन कॉलनी, बजाज नगर (3),  दीपज्योती हाऊसिंग  सोसायटी बजाज नगर (1),  दत्तकृपा कॉलनी जवळ बजाज नगर (1),  देवगिरी मार्केट जवळ बजाज नगर (2), सह्याद्री हाऊसिंग सोसायटी, बजाज नगर (1), मांडकी (1), पळशी (5), जय हिंद नगरी, पिसादेवी (1), कन्नड (1), मातोश्री नगर, औरंगाबाद (1) या भागातील कोरोना बाधित आहेत. या मध्ये 47 स्त्री व 55 पुरुष आहेत.

खासगी रुग्णालयात कोरोनाबाधिताचा मृत्यू 

शहरातील एका खासगी रुग्णालयात 19 जून रोजी सायं.5.15 मंजुरपुऱ्यातील 59 वर्षीय पुरूष कोरोनाबाधिताचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.  त्यामुळे घाटीत आतापर्यंत औरंगाबाद जिल्ह्यातील 131, औरंगाबाद शहरातील खासगी रुग्णालयांमध्ये एकूण 47, मिनी घाटीमध्ये 01 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाल्याने जिल्ह्यात एकूण 179 कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचे प्रशासनाने सांगितले आहे.

जालन्यात 29 नवे रुग्ण, लातुरात दोघांचा मृत्यू

जालना : २९ अहवाल पॉझिटिव्ह आल्यामुळे जालन्यातील बाधितांची संख्या ३५३ झाली. लातूरमध्ये दोन रुग्णांचा मृत्यू झाला आणि तीन नवे रुग्ण दाखल झाले. दरम्यान, नांदेड जिल्ह्यात नवे ५, तर बीड जिल्ह्यात २ रुग्णांची भर पडली आहे.

जालना जिल्हा रुग्णालयातील ब्लड बँकेचे पीआरआे आणि दिव्यांग कक्ष समन्वयकालाही कोरोनाची बाधा झाली. नांदेडमध्ये शुक्रवारी ५ नवे रुग्ण सापडल्याने नांदेड जिल्ह्याने रुग्णांचे त्रिशतक पूर्ण केले आहे. बीडमध्येही नवीन २ रुग्ण सापडल्याने तेथील रुग्णांची संख्या आता शतकाच्या जवळ पोहोचली आहे. उस्मानाबादलाही नवे तीन रुग्ण सापडल्याने रुग्णसंख्या १६८ वर गेली आहे. लातूर जिल्ह्यात शुक्रवारी दोघांचा मृत्यू झाला, तर तीन जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.

राज्यात ३,८२७ नवे रुग्ण

राज्यात शुक्रवारी ३,८२७ नवे रुग्ण, तर १४२ जणांच्या मृत्यूची नोंद झाली. राज्यात आता एकूण १ लाख २४,३३१ रुग्ण तर बळींची संख्या ५८९३ वर गेली आहे. शुक्रवारी १९३५ रुग्णांना डिस्चार्ज मिळाला. आजवर ६२,७७३ जण कोरोनामुक्त झाले. आता ५५,६५१ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

बातम्या आणखी आहेत...