आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मसिआ, चंद्रा इलेक्ट्रिकल्स, ‘ईशा’ चा पुढाकार:थॅलेसेमियाग्रस्तांसाठी 122 जणांचे उत्स्फूर्तपणे रक्तदान

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

थॅलेसेमियाग्रस्त बालकांसाठी मसिआ संघटना, चंद्रा इलेक्ट्रिकल्स अँड इलेक्ट्रॉनिक्स, धनंजय ग्रुप व ईशा फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने १५ डिसेंबर रोजी दोन ठिकाणी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यात एकूण १२२ जणांनी रक्तदान केले. त्यात ११ महिलांचाही सहभाग होता. शहर व परिसरात मोठ्या संख्येत थॅलेसेमियाग्रस्त बालकांचे प्रमाण असल्यामुळे दर महिन्याला बालकांना मोठ्या प्रमाणावर रक्तपुरवठा लागतो. त्या रक्तसाठ्याची पूर्तता करण्यासाठी वाळूज औद्योगिक परिसरातील उद्योजक नियमित प्रयत्न करत असतात. त्यातूनच या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. मसिआ कार्यालयात आयोजित शिबिरात ५१ तर चंद्रा इलेक्ट्रिकल्स कंपनीत आयोजित शिबिरात ७१ दात्यांनी रक्तदान केले. रक्तसंकलन सत्यसाई ब्लड सेंटर, दत्ताजी भाले रक्तपेढीने केले. कार्यक्रमासाठी रत्नप्रभा शिंदे, आरती पारगावकर, सारिका किर्दक, सुलभा थोरात आदींनी सहकार्य केले.

बातम्या आणखी आहेत...