आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आजच अर्ज करा:लष्करात पुजारी, मौलवी, भंते, पाद्री, ग्रंथीच्या 128 जागा भरणार ; 8 मिनिटांत 1600 मीटर धावावे लागणार

औरंगाबाद / डाॅ. शेखर मगरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

लष्करात धार्मिक विधीसाठी पंडित, पाद्री, मौलाना, ग्रंथी, भंते आदी पदांची भरती केली जाणार आहे. त्यासाठी रविवार (६ नोव्हेंबर) ऑनलाइन नोंदणीचा अखेरचा दिवस आहे. १२८ जणांची भरती होणार असून त्यात सर्वाधिक ११३ पंडितांच्या जागा आहेत. उमेदवारांनी www.joinindianarmy.nic.in या संकेतस्थळावर अर्ज करावा. शीख समाजातील ‘ग्रंथीं’ च्या ८ जागा आहेत. २६ फेब्रुवारी २०२३ रोजी लेखी परीक्षा घेतली जाणार आहे.

लष्करातील जवानांच्या आरोग्याची प्रार्थना करणे, लष्करी तैनातीत धार्मिक कार्य करणे, अंत्यविधीचे सोपस्कार पूर्ण करणे, शिक्षा झालेल्या सैनिकांच्या भेटीगाठी घेणे, रुग्णालयात उपचार घेत असलेल्या जवानांसाठी प्रार्थना करणे आदींसह लष्करात विशिष्ट प्रकारचे विधी करण्याच्या उद्देशाने ही भरती केली जाणार आहे. ऑनलाइन नोंदणी ८ ऑक्टोबरपासून सुरू केली होती. ६ नोव्हेंबर रात्री ११.५९ पर्यंत अर्ज करता येणार आहे. कोरोनाकाळात ही भरती करण्याचे नियोजन होते. मात्र, दोन वर्षे ही प्रक्रिया होऊ शकली नाही. आता पुन्हा जाहिरात प्रसिद्ध करून कोरोना काळातील नुकसान भरून काढण्यासाठी दोन वर्षांची शिथिलता दिली आहे. १ ऑक्टोबरपर्यंत वयोमर्यादा ३६ पेक्षा अधिक असू नये. किंबहुना २५ पेक्षा कमी नसावी.

संस्कृतमधून आचार्य पदवी असावी : पंडितच्या ११३ जागांसाठी तो उमेदवार हिंदू असावा. यूजीसी मान्यताप्राप्त विद्यापीठातून संस्कृत, शास्त्रीच्या आचार्य पदाची पदवी असावी. त्यांना धार्मिक पूजा करता आली पाहिजे. शीख धर्मातील ग्रंथींसाठी यूजीसी मान्यताप्राप्त विद्यापीठातून कुठल्याही शाखेचा पदवीधर आणि पंजाबी भाषेत ग्यानी असणे अनिवार्य आहे. ख्रिश्चन धर्मगुरूही पदवीधर असावा. त्यांच्या अधिकृत प्राधिकरणातून त्यांचे नाव मान्यताप्राप्त असावे, सुन्नी आणि शिया या मौलवींसाठी उमेदवार अलीम असावा, त्याचे उर्दू आणि अरबी भाषेवर प्रभुत्व असावे. बौद्ध भिक्खूंची एकच जागा असून उमेदवार पदवीधर व बौद्ध भिक्खूंच्या अधिकृत प्राधिकरणात उमेदवाराचे नाव असावे. बौद्ध भिक्खू मान्यताप्राप्त असावा.

बातम्या आणखी आहेत...