आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लष्करात कर्मकांड करणाऱ्या पुजाऱ्यांची भरती:रविवारी नोंदणीचा अखेरचा दिवस, 128 जागा भरणार

डाॅ. शेखर मगर | औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

लष्करात कर्मकांड करण्यासाठी पंडित, पाद्रे, मौलाना, ग्रंथी आदी पदांची भरती केली जाणार आहे. रविवारी (६ नोव्हेंबर) ऑनलाईन नोंदणीचा अखेरचा दिवस आहे. १२८ जणांची भरती होणार असून त्यात सर्वाधिक ११३ पंडितांच्या जागा आहेत. www.joinindianarmy.nic.in या संकेतस्थळावर अर्ज करावा. शिख समाजातील ‘ग्रंथीं’च्या ८ जागा आहेत. २६ फेब्रुवारी २०२३ रोजी लेखी परीक्षा घेतली जाणार आहे.

लष्करातील जवानांच्या आरोग्याची प्रार्थना करणे, लष्करी तैनातीत धार्मिक कार्य करणे, अंत्यविधीचे सोपस्कार पूर्ण करणे, शिक्षा झालेल्या सैनिकांच्या भेटी-गाठी घेणे, रूग्णालयात उपचार घेत असलेल्या जवानांसाठी प्रार्थना करणे आदींसह लष्करात विशिष्ट प्रकारचे कर्मकांड करण्याच्या उद्देशाने ही भरती केली जाणार आहे. ऑनलाईन नोंदणी ८ ऑक्टोबरपासून सुरू करण्यात आली होती. ६ नोव्हेंबर रात्री ११.५९ पर्यंत अर्ज करता येणार आहे. कोरोना काळात ही भरती करण्याचे नियोजन होते. मात्र दोन वर्ष ही प्रक्रिया होऊ शकली नाही. आता पुन्हा जाहीरात प्रसिद्ध करून कोरोना काळातील नुकसान भरून काढण्यासाठी दोन वर्षांची शिथिलता दिली आहे. १ ऑक्टोबर २०२२ पर्यंत वयोमर्यादा ३६ पेक्षा अधिक असू नये. किंबहुना २५ पेक्षा कमी नसावी.

संस्कृतमधून आचार्य पदवी असावी

पंडितच्या ११३ जागांसाठी तो उमेदवार हिंदु असावा. यूजीसी मान्यता प्राप्त विद्यापीठातून संस्कृत, शास्त्रीच्या आचार्य पदाची पदवी असावी. त्यांना धार्मिक पुजा करता आली पाहिजे. शिख धर्मातील ग्रंथींसाठी यूजीसी मान्यताप्राप्त विद्यापीठातून कुठल्याही शाखेचा पदवीधर आणि पंजाबी भाषेत ग्यानी असणे अनिवार्य आहे. ख्रिश्चन धर्मगुरूही पदवीधर असावा. त्यांच्या अधिकृत प्राधिकरणातून त्यांचे नाव मान्यता प्राप्त असावे, सुनी आणि शिया या मौलवींसाठी उमेदवार अलिम असावा, त्याचे उर्दू आणि अरबी भाषेवर प्रभुत्व असावे. बौद्ध भिक्खुंची एकच जागा असून उमेदवार पदवीधर व बौद्ध भिक्खुंच्या अधिकृत प्राधिकरणात उमेदवाराचे नाव असावे. बौद्ध भिक्खु मान्यता प्राप्त असावा.

शारीरीक क्षमता जवानांसारखीच

उंची १६० सेंटीमीटर, गोरखा आणि लद्दाख येथील पंडीतांसाठी ३ सेंटीमीटर कमी असेल तर चालेल. छाती-७७ सेंटीमीटर असावी. वजन-५०, लद्दाखी आणि गोरखांसाठी ४८ असावे. ८ मिनिटांत १६०० मीटर धावता आले पाहिजे.

दोनशे गुणांचे दोन पेपर

छाननीनंतर पात्र उमेदवारांची आधी शारीरीक क्षमता घेतली जाईल. त्यानंतर प्रत्येकी शंभर गुणांचे दोन लेखी पेपर घेतले जाणार आहेत. जनरल पेपरमध्ये पन्नास प्रश्नांसाठी प्रत्येती दोन असे शंभर गुण असतील. दुसऱ्या पेपरमध्ये संबंधित पुजेबद्दलचे ज्ञान तपासले जाणार आहे. एका चुकीच्या प्रश्नाला ०.५ गुण वजा केले जातील.

अशा आहेत जागा

१. पंडित-१०८

२. पंडित (गोरखा)-५

३.ग्रंथी-८

४. मौलवी (सुनी)-३

५. मौलनी-(सिया)-१

६. पाद्री-२

७. भंतेजी-१

एकूण-१२८

बातम्या आणखी आहेत...