आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बारवेची स्वच्छता:विद्यापीठातील बारवेची श्रमदानातून स्वच्छता

छत्रपती संभाजीनगर24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या पदव्युत्तर विभागाच्या वतीने २३ फेब्रुवारी ते १ मार्चदरम्यान विशेष शिबिर घेण्यात अाले. यात विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सकाळी योगासने, श्रमदान, व्याख्यान, संवाद आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे अायाेजन केले हाेते. तसेच शहरात अनेक जुन्या बारव वापराविना अडगळीत पडल्या आहेत. या श्रमदानांतर्गत तरुणांनी विद्यापीठातील मानसशास्त्र विभागाच्या परिसरातील मध्ययुगीन बारवेची स्वच्छता केली. जुन्या जलस्रोतांचे जतन व संवर्धन करण्याचा हा प्रयत्न आहे.

झाडेझुडपे, गवत आणि मातीने बारव पूर्ण झाकलेली होती. अनेक वर्षे वापरात नसल्यामुळे हळूहळू बारव विस्मरणात गेली होती. मात्र विद्यार्थ्यांनी दररोज श्रमदान करत बारव पूर्णपणे स्वच्छ केली. परिसरही स्वच्छ केला. आता पावसाळ्यात पाणीपातळी वाढल्यानंतर बारवेमधील पाणी वापरता येणार आहे. दरम्यान, ताराबाई शिंदे स्त्री अभ्यास केंद्रात ‘युवकांचा ध्यास : ग्राम-शहर विकास’ या विषयावर शिबिर घेण्यात आले. त्याचे रासेयाेचे संचालक डॉ. आनंद देशमुख यांच्या हस्ते उद्घाटन झाले. या वेळी डॉ. मुस्तजीब खान उपस्थित होते. डॉ. अपर्णा अष्टपुत्रे यांनी मार्गदर्शन केले.

उत्तम जलस्रोत
विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय सेवा योजनेच्या श्रमदानातून बारव स्वच्छ केली. या बारवेचा उत्तम जलस्रोत आहे. त्यामुळे जुन्या बारवेचे जतन आणि संवर्धन करण्याचा संदेश विद्यार्थ्यांनी दिला आहे. -डॉ. निर्मला जाधव, कार्यक्रम अधिकारी, राष्ट्रीय सेवा योजना

बातम्या आणखी आहेत...