आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बारावीच्या ओपन बुक टेस्ट परीक्षा सुरू:औरंगाबाद जिल्ह्यात प्रयोगिक तत्त्वावर नियोजन; उत्तर शोधायला शिक्षकांची मदत

औरंगाबाद10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबादमध्ये गुरुवारी बारावीच्या ओपन बुक टेस्ट परीक्षेला सुरुवात झाली. जिल्ह्यात प्रायोगिक तत्त्वावर या परीक्षेचे नियोजन करण्यात आले आहे.

पहिली परीक्षा विद्यार्थी शिक्षकांच्या सहाय्याने देतील. मात्र, दुसऱ्या साप्ताहिक परीक्षेसाठी शिक्षक मदत करणार नाहीत, असे कळवण्यात आले आहे.

पहिली साप्ताहिक परीक्षा

इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांनी नियमित महाविद्यालयात यावे. यासाठी शिक्षण विभागाच्या वतीने औरंगाबाद जिल्ह्यात प्रयोगिक तत्त्वावर साप्ताहिक परीक्षा घेण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यानुसार पहिली साप्ताहिक परीक्षा (ओपन बुक टेस्ट परीक्षा) सुरू करण्यात आली. गुरुवारी पहिल्या दिवशी इलेक्ट्रॉनिक्स, बायोलॉजी, कम्प्युटर सायन्स विषयाचे पेपर घेण्यात आले.

उर्वरित ठिकाणी नंतर...

औरंगाबादसह जिल्ह्यातील फुलंब्री, सिल्लोड, साेयगाव, खुलताबाद, वैजापूर या पाच तालुक्यांमध्ये गुरुवारी परीक्षा झाली. उर्वरित म्हणजेच गंगापूर, पैठण, कन्नड व औरंगाबाद शहर व ग्रामीण येथील महाविद्यालयात ही परीक्षा 2 डिसेंबरनंतर घेण्यात येईल.

लेखन सराव कमी

विद्यार्थ्यांचा गेल्या दोन वर्षांत लेखनाचा सराव कमी झाला आहे. तसेच सलग बसने आणि तीन तास लिहिणे देखील अवघड झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे औरंगाबाद माध्यमिक शिक्षण विभागाच्या वतीने यंदा बारावीच्या विद्यार्थ्यांचा सराव होण्यासाठी आणि बोर्ड परीक्षेच्या पूर्व तयारीसाठी साप्ताहिक परीक्षा ओपन बुक टेस्ट स्वरूपात घेण्यात येत आहे.

भीती दूर होण्यासाठी

खरे तर पहिली परीक्षा विद्यार्थी शिक्षकांच्या सहाय्याने देतील. मात्र, दुसरी साप्ताहिक परीक्षेसाठी शिक्षक मदत करणार नाहीत. मुलांनी या परीक्षेच्या माध्यमातून त्यांना अवघड वाटणाऱ्या गोष्टी जाणून घेत त्यावर बोर्ड परीक्षेपूर्वी सारवातून भीती दूर करावी हा मुख्य उद्देश असल्याचे माध्यमिक शिक्षणाधिकारी एम. के. देशमुख यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...