आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकोरोनामुळे विद्यार्थ्यांना परीक्षेचा ताणतणाव येऊ नये यासाठी लेखीसह प्रात्यक्षिक परीक्षांमध्ये शिथिलता दिली हाेती. तसेच अभ्यासक्रमातील काही भाग, तर प्रात्यक्षिकातील ३० टक्के भाग वगळला होता. मात्र, यंदा ही सवलत रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे दोन वर्षांनंतर प्रत्यक्ष प्रयोगशाळेत प्रात्यक्षिक परीक्षांना बुधवारपासून सुरुवात झाली आहे.
माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या बारावीच्या लेखी परीक्षेस २१ फेब्रुवारीपासून प्रारंभ हाेत आहे. त्यापूर्वी बारावीच्या प्रात्यक्षिक परीक्षेला सुरुवात झाली. या परीक्षेसाठी आवश्यक साहित्य मंडळाने वितरित केले आहे. २० फेब्रुवारीपर्यंत प्रात्यक्षिक चालणार आहे. प्रात्यक्षिकाचे नियोजन हे त्या-त्या कनिष्ठ महाविद्यालयांनी करण्याची मुभा मंडळाने दिली आहे. काही महाविद्यालयांनी सुरुवातीला भाषा, तर काहींनी प्रत्यक्ष विज्ञान शाखेचे प्रयोगशाळेत प्रात्यक्षिक सुरू केले. यंदा बाह्य परीक्षकांच्या निरीक्षणात हे प्रात्यक्षिक होत आहे. गेल्या वर्षी कोविडनंतर झालेल्या परीक्षेत विद्यार्थ्यांना होम सेंटर दिले हाेते. बुधवारी प्रात्यक्षिकाचा पहिलाच दिवस होता. यंदा औरंगाबाद विभागातून १ लाख ६८,२६३ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली.
िवभागीय स्तरावरील सराव परीक्षांमुळे मुलांमध्ये उत्साह दोन वर्षांनी प्रात्यक्षिक परीक्षा होत असल्यामुळे मुले थोडी शासंक आहेत. परंतु, मुलांची तयारी करून घेतलेली आहे. शिवाय विभागीय स्तरावर घेण्यात आलेल्या सराव परीक्षांमुळे मुलांमध्ये उत्साह निर्माण झाला असून त्याचा त्यांना लेखी व प्रात्यक्षिक परीक्षांमध्ये फायदा होईल. -प्रा.भरत वहाटुळे, शिवछत्रपती महाविद्यालय
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.