आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोरोना महामारीनंतर यंदा प्रथमच:2 वर्षांनी प्रत्यक्ष बारावीच्या प्रात्याक्षिक परीक्षांना प्रयोगशाळेत सुरुवात

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोरोनामुळे विद्यार्थ्यांना परीक्षेचा ताण-तणाव येवू नये. यासाठी लेखीसह प्रात्याक्षिक परीक्षांमध्ये शिथिलता देण्यात आली होती. तसेच अभ्यासक्रमातील काही भागही वगळण्यात आला होता. प्रात्याक्षिकातील 30 टक्के भाग वगळला होता. यंदा मात्र, सर्व सुरुळीत असल्याने दोन वर्षांनंतर प्रत्यक्ष प्रयोगशाळेत प्रात्याक्षिक परीक्षांना बुधवार पासून सुरुवात करण्यात आली. सुरुवातीला थोडी धाकधुक होती. परंतु सरावावामुळे फायदा होत असल्याचे शिक्षक, विद्यार्थ्यांनी सांगितले.

माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या बारावीच्या लेखी परीक्षेस २१ फेब्रुवारी पासून सुरुवात होत आहे. त्यापूर्वी बुधवार पासून प्रात्याक्षिक परीक्षेला सुरुवात झाली आहे. परीक्षेसाठी आवश्यक असणारे साहित्य मंडळाच्या वतीने वितरित करण्यात आलेले आहे.

20 फेब्रुवारी पर्यंत ही प्रात्याक्षिक परीक्षा चालणार आहे. प्रात्याक्षिकाचे नियोजन हे त्या त्या कनिष्ठ महाविद्यालयांनी त्यांच्यानुसार करण्यास विभागीय मंडळाच्या वतीने मुभा देण्यात आली आहे. काही महाविद्यालयांनी सुरुवातीला भाषा विषय तर काहींनी प्रत्यक्ष विज्ञान शाखेचे प्रयोग शाळेत प्रात्याक्षिक सुरु केले. यंदा बाह्य परीक्षांच्या निरीक्षणात हे पात्याक्षिक होत आहे. गेल्या वर्षी कोविडनंतर झालेल्या परीक्षेत विद्यार्थ्यांना ताण-तणाव नको म्हणून होमसेंटर देण्यात आले होते. तसेच अधिक एकमेकांशी जास्त संपर्क नको म्हणून प्रात्याक्षिक परीक्षेतील प्रयोगशाळेत अधिकचे साहित्य हातावे लागू नये यासाठी 30 टक्के भाग वगळण्यात आला होता. यंदा मात्र कोणत्याही प्रकारची सुट देण्यात आलेली नाही.

बुधवारी प्रात्याक्षिकाचा पहिलाच दिवस असल्याने काही महाविद्यालया विज्ञान तर काही ठिकाणी भाषा विषयांचे प्रात्याक्षिक घेण्यात आले. यंदा औरंगाबाद विभागातून एकूण 1 लाख 68 हजार 263३ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे.

''दोन वर्षांनी प्रात्यक्षिक परीक्षा होत असल्यामुळे मुले थोडे शासंक आहेत. परंतु मुलांची तयारी करून घेतलेली आहे. शिवाय विभागीय स्तरावर घेण्यात आलेल्या सराव परीक्षांमुळे मुलांमध्ये उत्साह निर्माण झाला असून, त्याचा त्यांना लेखी व प्रात्यक्षिक परीक्षांमध्ये फायदा होईल.'' - प्रा. भारत वहाटूळे - शिवछत्रपती कॉलेज

औरंगाबादेतील 12 वी परीक्षार्थींची शाखानिहाय आकडेवारी

विज्ञान - 36183, कला - 17458, वाणिज्य 5133, एमसीव्हीसी 1538, टेक्निकल 88, एकूण 60400

बातम्या आणखी आहेत...